ठाणेमुंबई
Trending

Actor Dharmendra : बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ हरपला! सुपरस्टार धर्मेंद्र यांचे निधन!

Legendary Bollywood actor Dharmendra dies at 89  : सहा दशके सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; सिनेसृष्टी शोकसागरात!

मुंबई :- बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ (He-Man) आणि हँडसम हंक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. तब्बल सहा दशके भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या या ‘कोहिनूर’ कलाकाराच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. Legendary Bollywood actor Dharmendra dies at 89

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्येत खालावल्यामुळे त्यांना साधारणतः बारा दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नुकताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता आणि ते घरीच विश्रांती घेत होते. मात्र, अखेर त्यांच्या जुहू येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी येताच बॉलिवूडमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यापासूनच विविध प्रकारच्या बातम्या माध्यमांमध्ये पसरत होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, देओल कुटुंबीयांनी अद्याप धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसली तरी, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

‘शोले’, ‘यादों की बारात’, ‘धरम वीर’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाने कोट्यवधी प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांच्या निधनाने कलासृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0