क्राईम न्यूजठाणेमुंबई

ठाणे पोलिसांची कारवाई ; अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या नायजेरीयन नागरिकास अटक

Thane Crime Branch Arrested Nigerian Man With Drugs : ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे शाखा कक्ष, गुन्हे शाखा ठाणे यांच्याकडून कोकेनचा साठा कुठून आणला होता? तो कुठे विकणार होता? याचा तपास करत आहेत.

ठाणे :- अंमलीपदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरियन नागरिकास ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट मालमत्ता गुन्हे शाखा यांनी अटक केले आहे. Thane Crime Branch Unit त्याच्याकडून 101.16 ग्रॅम वजनाचे कोकेन पावडर जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 10 लाख 12 हजार इतकी आहे. अझर उर्फ आलम आबीद शेख, वय (27 वय रा.मुंबई ) यास अंमलीपदार्थासह ताब्यात घेवून त्याने दिलेल्या माहितीवरून आरोपी उस्मान उर्फ सोनू अब्दुल कादीर शेख (37 वय रा. क्लेअर रोड, भायखळा, मुंबई) यास भाखखळा मुंबई येथुन अटक करून ओन्यादीकांची वॉन्को प्राचिओस ( वय 24 रा. जुहू गाव सेक्टर 11 नवी मुंबई ) येथून नायजेरियन व्यक्तीला अटक करण्यात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्ता गुन्हे शाखा, गणेश आता ठाणे यांना नवीन आरटीओ कार्यालय जवळील सर्विस रोडवर हे तीन आरोपी कोकन अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून यामधील तिन्ही आरोपींना अटक केली आहे. यामध्ये दोन नायजेरियन व्यक्तींचा समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कोकेनचा साठा कुठून आणला होता? तो कुठे विकणार होता? याचा तपास करत आहेत.

पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी गायकवाड,नगराज रोकडे, पोलीस हवालदार दिनेश कुंभारे, प्रशांत भुर्के, जयकर जाधव,सुनिल गिरे,जितेंद्र वाघमोडे, महिला पोलीस हवालदार आशा गोळे, पोलीस अंमलदार अशोक पाटील, महेश सावंत व सदन मुळे यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0