लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांची कारवाई ; पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात
Beed Anti Corruption News : माजलगाव पाटबंधारे विभाग परळी वैजनाथ येथील कार्यालयात कार्यकारी अभियंता याला 28 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
बीड :- माजलगाव पाटबंधारे विभाग परळी वैजनाथ येथील कार्यालयातील कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगर, यांनी शेतकऱ्याकडे तलावातील माती व गाळ उपसण्याकरिता परवानगी मंजूर करावी याकरिता सात शेतकऱ्यांकडे प्रत्येकी 5000 प्रमाणे लाच मागितली होती. तडजोडी अंत 4000 प्रमाणे 28 हजार रुपये रक्कम निश्चित करण्यात आली. आणि ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड Beed Anti Corruption Department Arrested Bribe Person यांनी कार्यकारी अभियंता याला रंगेहाथ अटक केली आहे. Beed Anti Corruption Latest News
अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात
तक्रारदार व साक्षीदार आणि गावातील त्यांचे 5 सहकारी शेतकरी यांनी चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्यासाठी माजलगाव पाटबंधारे विभागाचे कार्यालयात गाळ व माती काढण्याची परवानगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. सदरचे अर्ज हे कार्यालयीन प्रक्रियेनुसार लोकसेवक राजेश सलगर यांचेकडे परवानगी करीता प्रलंबित होते. लोकसेवक सलगर यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना गाळ व माती काढण्यासाठी परवानगी देण्याकरिता प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे सात शेतकऱ्यांना 35 हजार रुपयाची मागणी करून तडजोडंती प्रत्येकी 4 हजार प्रमाणे 28 हजार रुपयांची मागणी करून ते स्विकारण्याचे मान्य केले .त्यावरुन आज दिनांक 22 मे 2024 रोजी कार्यकारी अभियंता सलगर यांचे माजलगाव पाटबंधारे विभागाच्या परळी वैजनाथ येथील कार्यालयात सापळा कारवाईचे आयोजन केले असता लोकसेवक सलगर यांनी पंचा समक्ष लाच रक्कम 28 हजार रुपये स्वीकारताच लाच रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आले . त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन परळी वैजनाथ Parli Vajnath Police Station शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे . Beed Anti Corruption Latest News
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.मुकुंद आघाव, अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर,शंकर शिंदे पो उप अधीक्षक ला प्र वि बीड सापळा अधिकारी -युनूस शेख पोलीस निरीक्षक ला. प्र.वि .बीड,पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवड ला.प्र.वि.बीड सुरेश सांगळे, श्रीराम गिरम ,अविनाश गवळी , भरत गारदे,अमोल खरसाडे,अंबादास पुरी,स्नेहल कुमार कोरडे ,गणेश मेहेत्रे ला.प्र. वि.बीड. यांनी कार्यकारी अभियंत्याला सापळा रचून अटक केली आहे. Beed Anti Corruption Latest News