Accident News : डोंबिवली पंढरपूर बस अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला पाच लाखाची मदत, जखमींवर शासकीय खर्चातून उपचार मुख्यमंत्र्यांची घोषणा
CM Eknath Shinde Donate 5 Lakh For Dombivali Bus Accident Person : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बस अपघातात जखमी झालेल्या भाविकांची रुग्णालयात जाऊन घेतली भेट
पनवेल :- डोंबिवली ग्रामीण येथून पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर Mumbai Pune Bus Express Accident ट्रॅक्टर सोबत भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी भेट घेतली.
डोंबिवली ग्रामीण परिसरात राहणारे हे भाविक गेली 25 वर्षे आषाढी वारीनिमित पंढरपूरला जात होते. काल अचानक झालेल्या अपघातात 5 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. तर 7 प्रवासी हे गंभीररीत्या जखमी आहेत तर 23 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची डॉक्टरांकडून मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. Mumbai Pune Bus Accident
यासोबतच या दुर्घटनेत जीव गमवावा लागलेल्या प्रवाशांच्या कुटूंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर जखमी झालेल्यांवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच द्रुतगती महामार्गावर ट्रॅक्टर कसा आला याचीही चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.