सहलीच्या ऐनवेळेस अपघात: 19 वर्षीय विद्यार्थ्याचा डंपरखाली चिरडून मृत्यू

Mumbai Latest Accident News : मानखुर्द जंक्शनजवळ भीषण अपघात, डंपर चालक फरार
मुंबई | शैक्षणिक सहलीसाठी रायगड किल्ल्यावर निघालेल्या 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मानखुर्दजवळ Mumbai Mankhurd Accident News डंपरच्या धडकेत मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी घडली. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून Mumbai Traffic Police त्याचा शोध सुरू आहे.
मृत तरुणाची ओळख हसन इद्रीसी (19 वय) अशी असून तो चेंबूर येथील नारायण गुरु कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये बी.एससी.डी.एस.च्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्याच्यासोबत असलेला मित्र अशरफ शेख (20 वय) याच भागातील – गोवंडीतील बैगनवाडी परिसरातील – रहिवासी आहे.
कॉलेजने अधिकृत सहलीचे आयोजन केले असले तरी हसन व अशरफने त्यासाठी स्वतंत्रपणे दुचाकीने जाण्याचा निर्णय घेतला होता. गोवंडीहून इंधन भरल्यानंतर ते रायगडच्या दिशेने रवाना झाले. सकाळी साडेसहाच्या सुमारास मानखुर्द टी-जंक्शन जवळ त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव येणाऱ्या डंपरने (एमएच 43 सीके 7727) जोरदार धडक दिली.
धडकेमुळे दुचाकीवरील अशरफ रस्त्यावर फेकला गेला आणि जखमी झाला, तर मागे बसलेला हसन थेट डंपरच्या चाकाखाली येऊन गंभीररीत्या चिरडला गेला. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. डंपर चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला टाकून पलायन केलं.
या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी अज्ञात डंपर चालकाविरोधात IPC आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली गंभीर निष्काळजीपणाचं वाहन संचालन आणि अपघाती मृत्यू यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.



