ACB Trap Ravet | रावेत : लाचखोर पोलीस हवालदार अँटी करप्शनच्या जाळ्यात
- कायदेशीर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच | ACB Trap Ravet
पिंपरी, दि. १२ ऑक्टोबर, मुबारक जिनेरी
महाराष्ट्र मिरर
ACB Trap Ravet | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील PCPC रावेत Ravet पोलीस ठाण्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अपघाताचे प्रकरण आपआपसात मिटवून कायदेशीर कारवाई न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेणारा पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ANTI-CORRUPTION BUREAU OF MAHARASHTRA कचाट्यात सापडला आहे.
आरोपी लोकसेवक ज्ञानदेव तुकाराम बागडे, पोलीस हवालदार, रावेत पोलीस ठाणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दि. ११ रोजी हॊटेल गंधर्व शेजारी, पुनवळे याठिकाणी सापळा कारवाई करण्यात आली.
तक्रारदार व्यापारी असून, तक्रारदार यांच्या मुलाचा आणि एक मोटार सायकलस्वार यांचा पुनवळे येथे अपघात झाला होता. त्याबाबत एम.एल.सी. होवून लोकसेवक पो. हवा. ज्ञानदेव बगाडे यानी सदर अपघात प्रकरणी जबाब नोंदवून आपसात मिटवून देण्यासाठी व तक्रारदार यांच्या मुलावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी लोकसेवक ज्ञानदेव बगाडे यांनी तक्रारदार यांचेकडे ५,०००/- लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती. सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक ज्ञानदेव बगाडे यांनी तक्रारदार यांचेकडे वरील कामासाठी ५,०००/- रुपयांची लाच मागणी करुन, ५,०००/- (पाच हजार रुपये) लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारले असता लोकसेवक ज्ञानदेव बगाडे याना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध रावेत पोलीस स्टेशन,पिंपरी-चिंचवड, पुणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक विजय पवार तपास करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.