ACB Trap News : लाच स्वीकारताना दोन पोलीस आणि खाजगी व्यक्ती रंगेहाथ अडकले जाळ्यात; ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

ACB Arrested Bribe Person : जिल्हाधिकारी भरारी पथकातील दोघा पोलीस शिपायांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 50 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आलं आहे.
पालघर :- भागीदारी कंपनीच्या मालकीचे खड़ी वाहतुक करणारे कोणतीही कारवाई न करण्यासाठी 50 हजारांची लाच स्वीकारताना जिल्हाधिकारी कार्यालय भरारी पथकातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आणि एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे तालुक्यातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. Palghar Bribe News
यात पोलीस शिपाई दत्ता माधवराव शिंदे(वय 33) जिल्हाधिकारी भरारी पथक, पालघर, नेमणुक, प्रतिनियुक्ती बोईसर पोलीस ठाणे व पोलिस शिपाई श्रीराम सुर्यभान डाखुरे (वय 31) जिल्हाधिकारी भरारी पथक, पालघर, नेमणुक, प्रतिनियुक्ती मनोर पोलीस ठाणे, पालघर खाजगी इसम तृणाल मोहन धनु, (वय 37) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई आज (18 फेब्रुवारी) रोजी करण्यात आली आहे.
जेव्हा वर्दीतल्या रक्षकांची लालसा वाढते, तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण खात्यावर होतो. एक दोन भ्रष्ट कर्मचाऱ्यांपायी संपूर्ण पोलीस खात्याची बदनामी होते.
यातील तक्रारदार यांचे भागीदारी कंपनीच्या मालकीचे खड़ी वाहतुक करणारे हायवा वाहन व त्यासोबतचे हायवा वाहन शिरसाड नाका येथे पोलीस शिपाई दत्ता शिंदे व पोलीस शिपाई श्रीराम डाखुरे, दोन्ही नेमणुक जिल्हाधिकारी भरारी पथक, पालघर यांनी बेकायदेशीरपणे अडवुन त्या वाहनावर रॉयल्टी उल्लंघनाची कारवाई व वाहन जप्तीची कारवाई न करण्यानी वाहन चालकास धमकी देवून सदरची कारवाई टाळण्याकरीता प्रत्येकी हायवा वाहनाचे रू.1 लाख प्रमाणे असे एकुण 2 लाख रूपये लाचेची तक्रारदार यांचेकडे मागणी केली होती. तक्रारदार यांची पोलिसांना लाच देण्याची इच्छा नसल्याने तकारदार यांनी सोमवारी 17 फेब्रुवारी रोजी फोनद्वारे संपर्क साधुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार केली.
एसीबीने तक्रारीच्या अनुषंगाने दि. 18 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये आलोसे दत्ता शिंदे आणि खाजगी व्यक्ती तृणाल धनु हे घटनास्थळी प्रत्यक्ष मिळुन आले असुन त्यांनी तक्रारदार यांच्याकडुन खडी वाहतुकीचे ताब्यात घेतलेले दोन्ही हायवा वाहनावर रॉयल्टी उल्लंघनाची कारवाई व वाहन जप्त न करण्याकरीता रू. 50 हजार रुपयांची लाचेची रक्कमेची मागणी केल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले.
एसीबीने सापळा रचून कारवाई करून तक्रारदार यांच्याकडुन पोलीस शिपाई दत्ता शिंदे व पोलीस शिपाई श्रीराम डाखुरे यांनी पंचासमक्ष रू. 50 हजारांची रक्कमेची लाचेची रक्कम खाजगी व्यक्ती तृणाल धनु याचेमार्फतीने स्विकारतांना रंगेहाथ पकडले आहे. मांडवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती हर्षल चव्हाण पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर यांनी दिली आहे.