क्राईम न्यूज

ACB Trap News : महसूल सहाय्यकाने स्वीकारली 40 हजारांची लाच, महसूल सहाय्यक एसीबीच्या ताब्यात

ACB Trap News : शेतकरी असल्याचा दाखला 7/12 जमीनीची नोंद आणि फेरफार यांना जोडण्यासाठी तक्रारदाराकडून मागितले 40 हजारांची लाच

कल्याण :- तक्रारदार यांने रायते गावात मुरबाड रोड येथील जमिनीचे खरेदी केली होती. Kalyan Bribe News जमिनीच्या 7/12 वर तक्रारदाराचे नाव होऊन फेरफार मंजूर करण्याकरिता आवश्यक असलेल्या शेतकरी दाखला तक्रारीने त्याच्या मूळ गावी म्हणजेच उत्तर प्रदेश येथील जोनपुर तहसीलदार केराकत येथून मागविला होता. परंतु महसूल सहाय्यक यांनी फेरफार नाव नोंदणीकरिता तक्रारदार यांच्याकडे 40 हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी ठाणे एसीबीने महसूल सहाय्यक संतोष महादेव पाटील (वय 46) याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.ही कारवाई कल्याण तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारीच्या सांगण्यावरून एसीबीने केलेल्या पडताळणीमध्ये लोकसेवक संतोष महादेव पाटील, महसुल सहाय्यक, (तहसिलदार कार्यालय कल्याण) यांनी तक्रारदार याचेकडे मौजे रायते, मुरबाड, जि. ठाणे येथील सर्व्हे नं. 70 हिस्सा नं. 5 क्षेत्र 0.10.00 या खरेदी केलेल्या जमीनीचा 7/12 तक्रारदार यांचे नाव नोंद होवुन फेरफार मंजुर करणे करीता आवश्यक होते.तक्रारदार यांचा शेतकरी असल्याचा दाखला ” तहसिलदार केराकत, जौनपुर, राज्य उत्तर प्रदेश” यांचेकडुन तहसिलदार कल्याण यांचेकडे प्राप्त झाला होता. शेतकरी असल्याचा पुरावा/दाखला तकारदार यांचे नावे 7/12 जमीनीची नोंद होणेकरीता संबंधीत तलाठी सजा रायते यांना पुढील कार्यवाही करीता प्राप्त शेतकरी दाखल्यासह प्रस्ताव पाठविणेकरीता दि. 17 डिसेंबर करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये वीस हजार तहसिलदार यांचेकरीता 20 हजार स्वतः करीता असे एकुण लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

18 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक पाटील यांनी तक्रारदार यांचेकडुन मागणी केलेली लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष 40 हजार‌ तहसिलदार कार्यालयातील महसुल शाखा या कक्षाचे मागील बाजुस तकारदार यांचेकडुन स्विकारली. यावेळी लोकसेवक पाटील यांनी लाचेची रक्कम स्विकारल्याने सापळा पथकाने संतोष महादेव पाटील यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याची पुढील कारवाई महात्मा फुले चौक पोलीस येथे सुरु आहे.

एसीबी पथक
शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे,गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे संजय गोविलकर, अपर पोलीस अधीक्षक, मार्गदर्शनाखाली रुपाली पोळ पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे. यांनी लाचखोर महसूल सहाय्यकाला ताब्यात घेतले आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago