ACB Trap News : सरकारी अधिकाऱ्याने सरकारी अधिकार्याकडेच मागितली लाच ; 11 हजार रुपये लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहात पकडले

एसीबीची रत्नागिरी मोठी कारवाई
रत्नागिरी :- जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पुरवठा निरीक्षक यांच्याकडे पंधरा हजार रुपयांची लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, Anti Corruption Bureau रत्नागिरी यांनी कारवाई करत भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. Government Servant Bribe जिल्हाधिकाऱ्यांना नकारात्मक अहवाल न पाठवण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप प्रीतम केदार (50 वय) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.Ratanagiri Bribe News
एसीबीने दिलेल्या माहितीवरून,यातील तक्रारदार हे पुरवठा निरीक्षक संगमेश्वर म्हणून या पदावर कार्यरत आहेत. तक्रार यांच्या अखत्यारित असणारे संगमेश्वर येथील धान्य गोदाम यास जिल्हाधिकारी रत्नागिरी, तहसीलदार संगमेश्वर यांनी दिनांक 22 मार्च 25 रोजी भेट दिली होती.त्यावेळी तक्रारदार हे गैरहजर होते तसेच त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी केदार यांनी तक्रारदार यांचे अखत्यारीतील गोदामाची तपासणी करून धान्य साठ्यामध्ये तफावत असल्याचे सांगितले.
तसेच गैरहजर असल्याचे सांगून त्याबाबत वरिष्ठ कार्यालयास नकारात्मक अहवाल न पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पंधरा हजार रुपयांचे लाचेची मागणी केली त्यानुसार लोकसेवक केदार यांनी 28 मार्च रोजी तडजोडीअंती 11 हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले आहे
लाच रक्कम जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे तक्रारदार यांच्याकडून स्वीकारले, लोकसेवक यांनी लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 (सुधारित2018) चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई रत्नागिरी पोलीस ठाण्यात करण्यात येत आहे.
ही कारवाई शिवराज पाटील,पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र सुहास शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक
एसीबी ठाणे परिक्षेत्र, संजय गोविलकर अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र,अविनाश पाटील, पोलीस उपअधीक्षक, एसीबी, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधवला.प्र. वि रत्नागिरी सापळा पथक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव
सहाय्यक फौजदार चांदणे, पोलीस हवालदार दीपक आंबेकर,संजय वाघाटे,विशाल नलावडे
पोलीस पथक राजेश गावकर यांनी केली आहे.


