क्राईम न्यूज

ACB Trap News : “सरकारी मदतीचा सौदा” – लाचखोर लिपिक ACB च्या सापळ्यात गटांगी; मृत होमगार्डच्या मुलीकडून 15 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

ACB Trap News : सरकारी कर्मचाऱ्याचा अमानुष चेहरा उघड; फोन पे वर पैसे घेताच सापळा कार्यवाही, मोबाईलसह अटक

छत्रपती संभाजीनगर | “वडिलांचे जाणे दुखःद होते… पण सरकारी मदतीसाठी लाच मागितली जाते, हे अधिक वेदनादायक!”मृत होमगार्डच्या 24 वर्षीय मुलीने जेव्हा वडिलांच्या उपचार खर्चाची आणि सानुग्रह अनुदानाची फाईल पुढे सरकवण्यासाठी अर्ज केला, तेव्हा कार्यालयातील लिपिकाने सरळपणे सांगितले – “20 हजार द्या, फाईल पुढे जाईल.”या अमानुष आणि क्रूर वर्तनाचा पर्दाफाश करत ACB (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) ने एक धाडसी सापळा रचला आणि होमगार्ड कार्यालयातील प्रमुख लिपिक सोपान पंडितराव टेपले (वय 41) याला 15 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. Chatrapati Sambhaji Nagar Latest Bribe News

जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील लिपिकाकडून सानुग्रह अनुदान मंजुरीसाठी लाचेची मागणी

2 जुलै 2025 रोजी ACB ला तक्रार मिळाली. तक्रारदार महिला वडिलांच्या मृत्यूपश्चात मदतीसाठी अर्ज करत होत्या. टेपले यांनी त्यांच्या वडिलांच्या फाईलवर मंजुरी मिळवण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर रक्कम 15 हजारांवर आली आणि ती फोन पे द्वारे पाठवण्याचे सांगण्यात आले.3 जुलै 2025 रोजी सकाळीच तक्रारदार महिलेने फोन पे वरून 15,000 रुपये पाठवले. टेपलेने मोबाईलवर पैसे आल्याची खात्री देताच, ACB च्या पथकाने त्यांच्या N-12 होमगार्ड कार्यालयात छापा टाकून त्याला अटक केली.

कारवाईदरम्यान आरोपीकडून रेडमी कंपनीचा मोबाईल, कॅनरा व HDFC बँकेची एटीएम कार्डे व अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीच्या घराची झडती सुरू असून, पुढील तपासासाठी मोबाईलची तपासणी करण्यात येणार आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक) माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक राजू नांगलोत व सहाय्यक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे यांनी केली. पथकात राजेंद्र सिनकर, साईनाथ तोडकर व सी. एन. बागुल यांचा समावेश होता.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

40 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago