क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

ACB Trap News : भ्रष्टाचाराचा विळखा थेट तहसील कार्यालयापर्यंत! परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात

Parali ACB Trap News : सालन्सी सर्टिफिकेट’साठी मागितली होती लाच; मंत्रालयातील कारवाईनंतर आता महसूल विभागात मोठी खळबळ

परळी | राज्यात गेल्या काही दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला अटक केल्यानंतर, आता बीड जिल्ह्यातील परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाच प्रकरणात एसीबीने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराला ‘सालन्सी सर्टिफिकेट’ (Solvency Certificate – सधनतेचा दाखला) हवे होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याला विरोध केल्यानंतर तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.

सापळा ओळखूनही सुटका नाही

एसीबीने तक्रारदाराच्या माहितीनुसार तहसील कार्यालयात सापळा रचला होता. कारवाई सुरू असताना, तक्रारदाराच्या हालचालींवरून तहसीलदार मुंडे यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी ऐनवेळी लाचेचे पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केली. मात्र, एसीबीच्या पथकाने आधीच या मागणीचे आणि तडजोडीचे सर्व तांत्रिक पुरावे संकलित केले होते. लाचेची मागणी सिद्ध झाल्याने एसीबीने मुंडे यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्रशासनात खळबळ

गेल्या काही दिवसांतील एसीबीच्या कारवायांवर नजर टाकल्यास:

मंत्रालय: अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला अटक.

मुलुंड: एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई.

परळी: आता थेट तहसीलदारच जाळ्यात.

एकामागून एक वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या कचाट्यात सापडत असल्याने सरकारी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तरीही, सामान्य नागरिकांच्या हक्काच्या कामासाठी पैशांची मागणी होण्याचे वास्तव आजही कायम असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0