Mira Bhayandar ACB Trap News : घर जप्ती थांबवण्यासाठी कागदपत्रांच्या बदल्यात लाच घेतल्याचा आरोप
ठाणे | मिरा-भाईंदर येथील अपर तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक व एका खाजगी व्यक्तीविरोधात लाच घेतल्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोकडून कारवाई करण्यात आली आहे. Thane ACB Trap News एका तक्रारदाराच्या राहत्या घराची जप्ती प्रक्रिया थांबवण्यासाठी आणि कागदपत्रांच्या बदल्यात 60,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती. या प्रकरणात खाजगी व्यक्ती विनोद जयसिंग इंदुलकर याला 20,000 रुपये घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे, तर महसूल सहाय्यक शाम बिरू बोडेकर यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारदाराने घेतलेले कर्ज चुकल्यामुळे त्याच्या घरावर बँकेने ताबा मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. यावर कारवाई करत मिरा-भाईंदर कार्यालयातून 15 दिवसांत घर बँकेकडे सुपूर्त करण्याची नोटीस पाठविण्यात आली होती. या नोटीसविरोधात न्यायालयात दावा दाखल करताना आवश्यक कागदपत्रांसाठी तक्रारदार कार्यालयात गेले असता, त्यांच्याकडून लाचेची मागणी करण्यात आली होती.
अँटी करप्शनच्या पथकाने यासंदर्भात 1 जुलै रोजी सापळा रचून कारवाई केली. त्यात खाजगी इसम इंदुलकर याने 20,000 रुपये स्वीकारताना रंगेहात अटक झाली. या प्रकरणात महसूल सहाय्यक बोडेकर यांनीही लाचेची मागणी करण्यासाठी खाजगी व्यक्तीला प्रोत्साहन दिले असल्याचे उघड झाले आहे. तुमच्या विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सुहास शिंदे,संजय गोविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन मोरे यांच्या पथकाने पार पडली.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…