Anti Corruption Bureau Arrested Bribe Person : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कक्ष येथील तांत्रिक अधिकाऱ्यांवर सहा हजार रुपये लाचेची रक्कम घेताना कारवाई
छत्रपती संभाजीनगर :- सिल्लोड तालुक्यातील Sillod Taluka महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कक्ष पंचायत समिती येथे कार्यरत असलेल्या तांत्रिक अधिकारी महेश गजानन देवगिरीकर (35 वय) यांनी वीर मंजुरीचे बिल पास करण्याकरिता तक्रारदारांच्याकडून सहा हजार रुपयांचे लाचेची 6 Thousand Bribe मागणी करताना कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यात Sillod Police Station तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदार यांनी पंचायत समिती सिल्लोड येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना हमी योजना पक्ष येथे कार्यरत असलेल्या महेश देवगिरीकर तांत्रिक अधिकारी यांना तक्रारदार यांच्या आईच्या नावावर असलेल्या शेतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मंजूर विहिरीचे कुशल कामाचे एक लाख 5 हजार 856 रुपयाचे बिलाची फाईल दाखल असून ती मंजूर करण्यासाठी तांत्रिक अधिकारी देवगिरीकर यांनी तक्रारदार यांच्याकडे सहा हजार रुपयांची मागणी केली होती. यादरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर यांच्या युनिटने कारवाई करत तांत्रिक अधिकारी महेश देवगिरीकर यांना ताब्यात घेतली असून त्यांच्यावर सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर,सुरेश नाईकनवरे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी अमोल धस, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर सह सापळा अधिकारी चैनसिंग घुशिंगे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर,सापळा पथक पोलीस अंमलदार युवराज हिवाळे, पोलीस हवालदार देवसिंग ठाकूर, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांनी कारवाई करत अधिकाऱ्याला अटक केली आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…