ACB Trap News : लाभार्थी सिंचन विहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या कंत्राटी टेक्निकल असिस्टंट जाळ्यात, एसीबीची कारवाई

ACB Trap News : लाचखोर कंत्राटी टेक्निकल असिस्टंट पंचायत समिती सिल्लोड तालुका येथे कार्यरत होता
छत्रपती संभाजीनगर :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर वैयक्तिक लाभार्थी सिंचन विहिरीचे बिल ऑनलाईन मंजूर करण्याकरिता कंत्राटी टेक्निकल असिस्टंट याला बारा हजार रुपयांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. Chatrapati Sambhaji Nagar ACB अमोल हजारे (37 वय) असे टेक्निकल असिस्टंट याचे नाव असून तो पंचायत समिती सिल्लोड तालुक्यात कार्यरत आहे.
तक्रारदार याचे मौजे हळद तालुका सिल्लोड शिवारतील शेत गट नं 115 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर वैयक्तिक लाभार्थी सिंचन विहिरीचे बिल 12 लाख 60 हजार रुपये ऑनलाईन मंजूर करण्याकरिता अमोल हजारे (कंत्राटी, टेक्निकल असिस्टंट) यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष 12 हजार रुपयांची लाच मागितली होती. एसीबीने पडताळणी करून आरोपीला पंचायत समिती सिल्लोड कार्यालय समोरील जुगणू फ्रुट ज्यूस सेंटर येथे बारा हजार रुपयाची लास्ट स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. त्याच्या विरोधात सिल्लोड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजी नगर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, उप पोलीस अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी शांतीलाल चव्हाण पोलिस निरीक्षक, सापळा पथक पोलीस हवालदार रवींद्र काळे, राजेंद्र सिनकर, पोलीस अंमलदार राम गोरे, रामेशोर ताटे यांनी कारवाई करत कंत्राटी कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे.