ACB Arretsed Man For 1 lakh Bribe : सरपंच पद आणि सदस्यत्व रद्द करण्यात यावे यासाठी चालू असलेल्या याचिकेवर सरपंचाच्या बाजूने निकाल लागावे याकरिता मागितली होती, एक लाख रुपयांची लाच
छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, Anti Corruption Bureau छत्रपती संभाजीनगर यांनी कारवाई करत एका लाचखोर अधिकाऱ्याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. 1 Lakh Bribe सरपंच पत्नी यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे चालू असलेल्या सरपंच पद आणि सदस्यत्व रद्द याचिकेवर आपल्या बाजूने निकाल लागावा याकरिता सरपंचाच्या पतीस अधिकाऱ्याने एक लाख रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी एसीबीने दीपक लक्ष्मण बागुल (50 वय) विस्तार अधिकारी, पंचायत विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर यांना ताब्यात घेतल्या. Anti Corruption Bureau Latest News
तक्रारदार हे सरपंच पती असून त्यांच्या सरपंच पत्नी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांचेकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) अन्वये सरपंच पद व सदस्यत्व रद्द करण्यात यावे या यासाठी दाखल प्रकरणाची चौकशी ची सुनावणी चालू आहे. सुनावणीअंती सरपंच यांच्या बाजूने विभागीय आयुक्त यांना अहवाल सादर करण्यासाठी दीपक बागुल यांनी पंचा समक्ष एक लाख रुपयांची मागणी करून स्वीकारले असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.बेगमपुरा पोलीस ठाण्यात Begampura Police Station गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. Anti Corruption Bureau Latest News
एसीबी पथक
संदिप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर, मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर,सापळा पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक सुरेश नाईकनवरे,
यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश नाईकनवरे पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर. सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक दिलीप साबळे सापळा पथक पोलीस हवालदार भीमराज जिवडे, पोलीस नाईक राम गोरे, छत्रपती संभाजी नगर, यांनी कारवाई करत लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…