ACB Trap News : महावितरणमधील कनिष्ठ अभियंत्यावर एसीबीची कारवाई

Engineer Of Mahavitaran Caught BY ACB : सौर पंपाचे मंजुरी मिळण्याबाबत 20 हजारांची लाच घेताना कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात
छत्रपती संभाजीनगर :- शिवार शेतीतील पाच संच सौर पप्पा चे मंजुरी मिळवण्यासाठी 20 हजार रूपयांची लाच घेताना महावितरण विभागातील कनिष्ठ अभियंताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले आहे. Engineer Of Mahavitaran Caught BY ACB अभियंताविरोधात बिडकीन पोलिस ठाण्यात Bidkin Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश काशिनाथ घावट (35 वय) असे ताब्यात घेतलेल्या अभियंताचे नाव असून, घावट हे बिडकीन ता.पैठण उपविभाग महावितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत आहे. तक्रारदाराने लाचलुपचत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांच्या मौजे टाकळी तालुका पैठण शिवार शेतातील 5 संच सौर पंपाचे मंजुरी अर्ज करून घेण्यासाठी शासकीय फी भरली त्यानंतर महावितरण कार्यालयाचे मंजुरी देण्याकरिता तक्रारदाराने महावितरण कार्यालयात अर्ज दाखल केला होता.
या अर्जावार कारवाई करण्यासाठी अभियंत्याने तक्रारदाराकडे 20 हजाराची लाच मागितली. लाच दिल्याशिवाय काम होणार नाही, याची खात्री झाल्यावर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी यांनी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. कनिष्ठ अभियंता यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती परंतु तडजोडी अंती ही रक्कम 20 हजार निश्चित करण्यात आली आहे. लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपीला एसीबीने अटक करून त्याच्या विरोधात बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्ह्या दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर सुरेश नाईकनवरे पो. उप अधिक्षक ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी- केशव दिंडे पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर सापळा पथक पोलीस हवालदार नागरगोजे, आत्माराम पैठणकर, आमलदार चालक ताटे, ला. प्र. वि.छत्रपती संभाजीनगर यांनी कारवाई केली आहे.