क्राईम न्यूजछत्रपती संभाजी नगर
Trending

ACB Trap News : “दहा हजारांचा सौदा… आणि ग्रामसेवक जाळ्यात!”

Chatrapti Sambhaji Nagar ACB Trap News : लाच घेताना ग्रामसेवक रंगेहाथ पकडला; चहाच्या टपरीवर ‘एसीबी’ची धाड,स्मशानभूमीच्या कामाच्या बिलासाठी मागितली होती लाच; उपसरपंचाची धाडसी तक्रार

छत्रपती संभाजीनगर | सरकारी काम वेळेवर व्हावं म्हणून एखाद्या ग्रामसेवकाला लाच दिली जाते, हे दुर्दैवाच. मात्र यावेळी एका धाडसी उपसरपंचाने हा अन्याय नाकारत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि संपूर्ण छत्रपती संभाजीनगरात खळबळ उडवणारी सापळा कारवाई उघडकीस आली. Chatrapti Sambhaji Nagar ACB Trap News

भायगाव (ता. वैजापूर) येथे स्मशानभूमीचे काम जनसुविधा अंतर्गत करण्यात आले होते. यासाठी एकूण 6 लाख 96 हजार निधी मंजूर झाला होता. हे काम पूर्ण झाल्यानंतर उपसरपंच व तक्रारदाराने आवश्यक प्रमाणपत्र (NOC) ग्रामपंचायत कार्यालयात सादर केले. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतरही 94 हजार चे उर्वरित बिल पास करण्यासाठी ग्रामसेवक विजयकुमार पंडितराव क्षीरसागर (वय 53) यांनी 15 हजार रुपयांची लाच मागितली.तक्रारदाराने लाच देण्याऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या ACB कार्यालयात तक्रार नोंदवली. या तक्रारीची पडताळणी 18 जून रोजी शासकीय पंचासमवेत करण्यात आली. भेटीत आरोपीने प्रत्यक्ष लाच मागणी करत दहा हजार रुपये देण्याची तडजोड केली होती.

संपूर्ण सापळा अगदी काटेकोरपणे आखण्यात आला होता. आरोपीने तक्रारदारास “चैतन्य टी हाऊस, जरुळ फाटा येथे या,” असे सांगितले. ठरल्याप्रमाणे तक्रारदार पंचासह ठिकाणी गेले आणि थेट चर्चेदरम्यान विजयकुमार क्षीरसागर याने दहा हजार ची लाच स्वीकारली. या क्षणाचीच ACB पथक वाट पाहत होते. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आरोपीला रंगेहाथ पकडले.

अटक केल्यानंतर त्याची अंगझडती घेण्यात आली. त्यात सॅमसंग A-35 5G मोबाईल, काळ्या रंगाचे पाकीट, त्यातील आधार कार्ड, पॅन कार्ड, परवानपत्र, सातशे रोख रक्कम व दुचाकीची किल्ली जप्त करण्यात आली. त्याच्या घरझडतीचे कामही सुरू आहे. या प्रकरणात भ्र.प्र. अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

acb sp sandeep aatole

ही सापळा कारवाई पोलीस उपाधीक्षक संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांना पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव, आणि पोलीस उपाधीक्षक सुरेश नाईकनवरे यांचे मार्गदर्शन लाभले. सापळा पथकामध्ये पोलीस हवालदार राजेंद्र सिनकर, पोलीस अंमलदार विलास चव्हाण, आणि सी.एन. बागुल यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0