ACB Trap News : 75 वर्षीय शाळेतील सचिवाला तीन लाखांची लाच स्वीकारताना अटक; एसीबीची मोठी कारवाई
ACB Arrested School Sachiv For Taking Bribe : सेंट फ्रान्सिस डिसेल्स एज्युकेशन सोसायटी, छत्रपती संभाजी नगर शाळेच्या सचिवाने पगार चालू करण्यासाठी अनुकंपा तत्त्वावर लागलेल्या तक्रारदाराकडून मागितली तीन लाख रुपयांची लाच
छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजी नगर मधील प्रसिद्ध शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.सेंट फ्रान्सिस डीसेल्स एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर येथील या संस्थेच्या सचिवाने अनुकंपा तत्त्वावर लागलेल्या तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी 75 वर्षीय सचिवाला एसीबीने ताब्यात घेतले आहे. ACB Bribe Trap फादर विल्फ्रेड मार्टिन सालढाना असे सचिवाचे नाव असून त्यांना एसीबीने तीन लाख रुपयांची लाच 3 Lakh Bribe स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे अनुकंपा तत्वावर संस्थेच्या शाळेत नोकरीस लागलेले आहेत.त्यांचा पगार सुरू करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठवण्याकरिता तीन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. आज (12 डिसेंबर) रोजी फादर विल्फ्रेड यांनी पंच साक्षीदारा समक्ष लाच रक्कम सचिव कार्यालयात, भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूल, गंगापूर, येथे स्वीकारत असता त्यांना ताब्यात घेण्यात आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर,सुरेश नाईकनवरे पोलीस उप अधिक्षक
ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी अमोल धस, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर सापळा सहाय्यक अधिकारी विजयमाला चव्हाण, पोलीस निरीक्षक ,ला. प्र. वि छत्रपती संभाजी नगर सापळा पथक – पोलीस अंमलदार युवराज हिवाळे, जीवडे , सी एन बागुल ला. प्र. वि. यांनी कारवाई करत सचिवाला ताब्यात घेतले आहे.