ACB Trap News : 40 हजारांची लाच स्वीकारणं भोवलं; कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात
Chatrapati Sambhaji Nagar ACB Trap News : महावितरणच्या अंबड उपविभागातील कार्यकारी अभियंत्याला 40 हजारांची लाच घेताना छत्रपती संभाजी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
छत्रपती संभाजीनगर :- महावितरणच्या अंबड उपविभागातील कार्यकारी अभियंत्याला 40 हजारांची लाच घेताना छत्रपती संभाजी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. Sambhaji Nagar 40 Thousand Bribe News ट्रांसफार्मर चे मागील चार महिन्याचे थकीत बिल काढून देण्याच्या मोबदला म्हणून अभियंत्याने 50 हजार रुपयांची लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 40 हजार रुपये घेतले.
प्रकाश रामकृष्णराव तौरा (वय 53) असे या कार्यकारी अभियंताचे नाव आहे.याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे गुत्तेदार असून त्यांनी अंबड उपविभागाअंतर्गत बसवून दिलेल्या ट्रांसफार्मर चे मागील चार महिन्याचे बिले काढून देण्यासाठी प्रकाश तौर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, (एम एस ई बी, उपविभाग अंबड) यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 50 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 40 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करून तक्रारदार यांचेकडून 40 रुपये लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता त्यांना लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आहेत.
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर, बाळु एस. जाधवर, पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी- अविनाश घरबुडे, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि जालना,सापळा पथक पोलीस अंमलदार जावेद शेख,शिवलिंग खुळे, गणेश बुजाडे, भालचंद्र बिनोरकर यांनी कारवाई करत कार्यकारी अभियंत्याला जेरबंद केले आहे.