ACB Trap : कुशल बिल ऑनलाइन अपलोड करण्याकरिता लिपिक (कंत्राटी) मागितली 2 हजारांची लाच; एसीबीकडे तक्रार येताच पकडले रंगेहात
Anti Corruption Bureau Arrested Officer In Bribe Trap : लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तालुका कृषी अधिकारी कार्यालय परंडा येथील डाटा एन्ट्री ऑपरेटर यांला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले,गुन्हा दाखल
धाराशिव :- कुशल बिल अपलोड करण्याकरिता दोन हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव,तालुका कृषी अधिकारी कार्यालय परंडा लिपिक (कंत्राटी,डाटा एन्ट्री ऑपरेटर) यांला रंगेहात पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. “Busted: ACB Catches Lipik Operator Red-Handed in Bribery Scandal” विकास विजयकुमार बनसोडे (35 वर्ष) असे कर्मचाऱ्यांचे नाव असून तो तालुका कृषी अधिकारी कार्यालय,परंडा येथे लिपिक पदावर कंत्राटी म्हणून कार्यरत आहे. Anti Corruption Bureau Latest News
तक्रारदार यांचे भावाचे नावे महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत मौजे सोनारी येथे शेत गट नंबर 92 मध्ये लागवड केलेल्या केळी या फळबागेचे 39 हजार 852 रुपयाचे कुशल बिल ऑनलाईन अपलोड करण्यासाठी आणि तक्रारदार यांचे पुढील महिन्यात निघणारे दोन मस्टरचे बिल ऑनलाईन अपलोड करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 2500 रुपये लाचेची मागणी “The Lipik Controversy: Corruption and Greed Exposed” करून तडजोडअंती 2000 रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून 2000 हजार रुपये लाच रक्कम पंचा समक्ष स्वतः स्विकारली असता बनसोडे याला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस ठाणे परंडा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. Anti Corruption Bureau Latest News
एसीबी पथक
संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर,मुकुंद आघाव ,अपर पोलीस अधीक्षक,
ला.प्र. वि, छत्रपती संभाजीनगर,पर्यवेक्षण अधिकारी-सिद्धाराम म्हेत्रे , पोलीस उपअधीक्षक,ला.प्र.वि. धाराशिव युनिट. यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी-विकास राठोड पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि.धाराशिव,सापळा पथक -पोलीस अमलदार इप्तिकार शेख, मधुकर जाधव, विशाल डोके, दत्तात्रेय करडे यांनी कारवाई करत अटक केली आहे.