महाराष्ट्र
Trending

ACB Trap Beed | बीड बांधकाम परवान्यासाठी ९ लाखांची लाच : कनिष्ठ अभियंत्यासह एकास बेड्या

  • बीड नगर परिषदेतील भोंगळ कारभाराची लाच लुचपत विभागाकडून पोलखोल
  • पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या नेत्तृत्वाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई सुरूच

बीड, दि. २३ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर ACB Trap Beed
Mubarak Jineri

ACB Trap Beed | बांधकाम परवाना देण्यासाठी ९ लाखांची लाच मागणाऱ्या बीड नगर परिषदेतील नगर रचना विभागातील कनिष्ठ अभियंता व सहकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यात बोकाळलेला भ्रष्टाचार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोडून काढला जात आहे. छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक संदीप आटोळे ACB SP Sandeep Aatole यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात कारवायांचा सपाटा लावण्यात आला आहे. यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे.

संशयित फारुकी अखिल आहेमद वकील आहेमद, वय 50 वर्ष, कनिष्ठ अभियंता, नगर परिषद, बीड वर्ग 3. व खाजगी इसम किशोर कोंडीराम खुरमुरे, वय 35 वर्षे, रा. स्वराज्य नगर, बीड यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आज दि. २३ ऑक्टोबर रोजी SBI bank राजुरी वेस येथे पोलीस उप अधीक्षक शंकर शिंदे यांच्याकडून सदर कारवाई करण्यात आली.

तक्रारदार यांचे वडील व त्यांचे शेजारी यांचे बांधकाम परवाना काढण्यासाठी नगर रचना विभाग, नगर परिषद, बीड येथील परवानगी देण्यासाठी लोकसेवक फारुकी आखिल यांचे खाजगी मदतनीस किशोर खूरमुरे यांनी 12,00,000(बारा लाख)रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 9,00,000/- (नऊ लाख) रुपयेची मागणी केली. लोकसेवक फारुकी अखिल यांनी लाच रक्कम स्वतःसाठी मिळावी म्हणून लाच रक्कम खाजगी इसम किशोर खुरमुरे यांचेकडे देण्यास सांगून प्रोत्साहन दिले. अँटी करप्शन विभागाकडून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

acb sp sandeep aatole
ACB C.Sambhajinagar SP Sandeep Aatole

सदर कारवाई छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी शंकर शिंदे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. बीड व सापळा पथक – पोलीस अंमलदार, सांगळे, गोरे, गिराम, राठोड, गरदे, गवळी, खरसाडे, निकाळजे गणेश मेहेत्रे ला. प्र. वि. बीड यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0