Ambad ACB Trap News : अंबड तालुक्यातील शारदानगर येथील सापळा; आरोपीकडून मोबाईलसह रोख रक्कम जप्त
जालना :- ग्रामपंचायत कुक्कुड, ता. अंबड येथील कार्यरत ग्रामविकास अधिकारी विष्णू शामराव भानुशे (वय 57) याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जालना युनिटने सापळा Jalana ACB Unit रचून रंगेहात अटक केली. तक्रारदाराकडून 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शारदानगर, अंबड येथील राहत्या घरी पंचासमक्ष ही कारवाई करण्यात आली. Maharashtra ACB Latest News
तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या मोकळ्या जागेचे 8अ नमुन्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोपी भानुशे याने शुक्रवारी ( 29 मे) रोजी 15 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे दाखल करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी 30 मे रोजी करण्यात आली. त्यानंतर आज (31 मे) सकाळी आरोपीने तक्रारदाराकडून मागितलेली रक्कम स्वीकारताना त्याला जाळ्यात पकडण्यात आले.
पंधरा रुपयांची लाच घेताना जालना एसीबीच्या पथकाची यशस्वी कारवाई
कारवाईदरम्यान आरोपीच्या अंगझडतीत 15 हजार रुपये लाच रक्कमेसह अतिरिक्त 830 रुपये आणि ‘Realme’ कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याला अटक करून अधिक तपास करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक संदीप आटोळे व अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा कारवाईसाठी पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार श्रीनिवास गुडूर, मनोहर भुतेकर, शिवलिंग खुळे, गणेश चेके, अमोल चेके, विठ्ठल कापसे या अधिकाऱ्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…