क्राईम न्यूजमहाराष्ट्र
Trending

ACB Dharshiv Trap News : महसूल क्षेत्रात मोठी खळबळ ; मंडळ अधिकारी आणि सहाय्यक महसूल हे दहा हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

ACB Dharashiv Trap News : तुळजापूर मधील मंडळ अधिकारी आणि सहाय्यक महसूल यांना 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

धाराशिव :- महसूल विभागातून Revenue department Bribe News खळबळ उडून नेणारी घटना समोर आली आहे.तुळजापूर मंडळ अधिकारी जयंत श्रीपतराव गायकवाड (47 वर्ष ) आणि महसूल सहाय्यक बाळासाहेब प्रकाश पवार (45 वर्ष) यांना 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. Dharashiv Revenue department Bribe News शेतीतील 20 गुंठे जमिनीचे खोदकाम करून मुरूम व माती आजूबाजूला पसरून सपाटीकरण करण्यासाठी किरकोळ रॉयल्टी भरून कोणती कारवाई न करण्याकरिता 15 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडअंती 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. ACB Arrested Dharashiv Revenue department Bribe Officer

Kopar Khairne Police Station

तुळजापूर महसूल विभागात एसीबीची कारवाई करण्यात आली असून एसीबीने या कारवाईमध्ये दोन लाचखोर कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना अटक केली आहे.यातील तक्रारदार यांचे मालकीचे शेतीतील 20 गुंठे जमीनीचे खोदकाम करुन त्यातील मुरुम व माती आजुबाजुला पसरवून सपाटीकरण करण्यासाठी किरकोळ रॅायल्टी भरुन घेवुन कोणतीही कारवाई न करण्यासाठी गायकवाड याने पंचासमक्ष 15 हजार रुपये लाच रकमेची मागणी करुन तडजोडीअंती 10 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले व सदरची लाच रक्कम ही पवार यांनी गायकवाड यांच्या सांगण्यावरून पंचासमक्ष स्विकारले असता दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असुन तुळजापुर पोलीस ठाणे Tuljapur Police Station (जि धाराशीव) येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. ACB Arrested Dharashiv Revenue department Bribe Officer

एसीबी पथक
संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर.,मुकुंद आघाव अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र. वि, छत्रपती संभाजीनगर सापळा अधिकारी सिद्धाराम म्हेत्रे , पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट. यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक-पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, नागेश शेरकर महसूल विभागातील दोन लाचखोर अधिकारी कर्मचारी यांना अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0