Beed ACB Trap News : बीड एसीबीच्या धडक कारवाईत खाजगी व्यक्तीवर गुन्हा दाखल ; रेशन कार्ड बनवून देण्यासाठी घेतली लाच
बीड :- बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत खाजगी व्यक्तीला 12 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. Beed Bribe News विश्वनाथ अभिमान पवार (34 वय ) असे अटक करण्यात आलेल्या खाजगी व्यक्तीचे नाव असून तो पुरवठा विभाग तहसील कार्यालय वडवणी येथे मदतनीस म्हणून काम करत आहे. Beed Crime News
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार यांनी त्यांचे व कुटबीयांचे नावे असलेले बी.पी.एल. रेशन कार्ड (सिधा पत्रिका) जळाल्याने नवीन मिळण्यासाठी तहसील कार्यालय वडवणी येथे पुरवठा विभागात जाऊन नवीन रेशन कार्ड मिळण्यासाठी विनंती अर्ज केला होता.विश्वनाथ पवार (खाजगी व्यक्ती) यांनी नवीन बीपीएल राशन कार्ड तयार करून देण्यासाठी सहा हजार रुपयाची मागणी करून सहा हजार रुपये फोन पे वर स्वीकारले. त्यानंतर तक्रारदाराचा मित्र यांना बीपीएल रेशन कार्ड वर नायब तहसीलदार यांचा सही शिक्का घेण्यासाठी 14 हजार रुपये लाचेची मागणी केली. तसा निरोप तक्रारदार यांचा मित्र याने तक्रारदारास दिला. त्यावरून खाजगी व्यक्ती विश्वनाथ पवार यांनी तक्रारदारास 14 हजार रुपयांची लाच मागणी केली.
तक्रारदार यांनी दिनांक 7 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड येथे फोन करुन वडवणी येथे येऊन तक्रार घेऊन कारवाई करण्याची विनंती केली .त्या अनुषंगाने 7 एप्रिल रोजी आरोपी खाजगी इसम विश्वनाथ पवार यांच्याकडे तक्रारदार पंचा समक्ष यांना पाठवून लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी विश्वनाथ पवार खाजगी इसम यांनी तक्रारदार यांच्याकडे पुरवठा विभागातील अधिकारी यांचे करीता 14 हजार लाचेची मागणी करून तडजोडअंती 12 हजार रुपये लाच मागणी केली व लागलीच लाच रक्कम स्वतः स्वीकारण्याचे मान्य केले.
एसीबी पथक
संदीप आटोळे,पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव,अप्पर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी शंकर शिंदे पोलीस उप अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बीड
सापळा पथक पोलीस अंमलदार भरत गारदे ,सफौ सुरेश सांगळे,श्रीराम गिराम ,सुदर्शन निकाळजे ,बिभीषण सांगळे ,अमोल खरसाडे, चालक अंबादास पुरी यांनी कारवाई केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…