नवी मुंबई, २६ ऑगस्ट : अॅन्टी करप्शन ब्युरो (ACB), नवी मुंबई यांनी आज मोठी कारवाई करताना सीडकोच्या क्षेत्रीय कार्यालयातील महिला अधिकारी आणि कंत्राटी कामगाराला ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. Navi Mumbai Latest Crime News
जुईनगर (प.), सेक्टर २४ येथील सीडको प्लॉटवर गणपती आणि देवीच्या मूर्तींसाठी मंडप उभारण्यासाठी परवानगी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यासाठी ना हरकत दाखला (NOC) मिळवून देण्यासाठी सीडकोच्या क्षेत्रीय अधिकारी स्मिता प्रभाकर ठाकुर (वय ५३) आणि कंत्राटी कामगार योगेश अंबाजी कोळी (वय ३०) यांनी तक्रारदाराकडे ५०,००० रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ही रक्कम ३०,००० रुपये ठरली.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनंतर ACB ने २५ ऑगस्ट रोजी मागणीची पडताळणी केली. त्यात दोन्ही आरोपींनी लाच मागणीची पुष्टी केली. त्यानंतर आज (२६ ऑगस्ट) दुपारी १२.४० वाजता सिडको कार्यालयाबाहेर, आरोपी योगेश कोळी हा तक्रारदाराकडून ३०,००० रुपयांची लाच स्वीकारताना पंचासमक्ष रंगेहात पकडला गेला. त्यानंतर अधिकारी स्मिता प्रभाकर ठाकुर यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
ACB पथकाने या दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या कारवाईत अॅन्टी करप्शन ब्युरो, नवी मुंबई पथकाने यश मिळवले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…