Abu Azami : होळी आणि नमाजवर अबू आझमींचं मोठं वक्तव्य, ‘कोणी रंग फेकले तर रमजान…

Abu Azami On Holi And Ramzan : होळी आणि रमजान दरम्यान शुक्रवारच्या नमाज संदर्भात वक्तव्य चालू आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे (एसपी) आमदार अबू आझमी यांनी जनतेला मोठे आवाहन केले आहे.
मुंबई :- समाजवादी पक्षाचे (एसपी) अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी Abu Azami यांनी होळी आणि रमजानच्या काळात शुक्रवारच्या नमाजासाठी लोकांना मोठे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, मुस्लिम बांधवांना विनंती आहे की तुमच्यावर कोणी रंग टाकला तर धीर धरा.
त्यांनी व्हिडीओ जारी करून म्हणाले,इस्लाममध्ये नमाज आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. तुम्ही मशिदीत नमाज अदा करता आणि गरज पडल्यास घरीही नमाज अदा करता येते, पण शुक्रवारची नमाज घरांमध्ये नव्हे तर मशिदीतच अदा करावी लागते.
मानखुर्द शिवाजी नगरचे आमदार आझमी म्हणाले, “उद्या 14 मार्चला रमजान आणि होळी आहे. जे वर्षभर नमाज अदा करत नाहीत ते रमजानमध्ये नमाज अदा करतात. कारण ते महत्त्वाचे आहे.मी हिंदू बांधवांना आवाहन करतो की तुम्ही जाणूनबुजून कोणावरही रंग टाकू नका, छेडण्यासाठी रंग टाकू नका. मला मुस्लिम बांधवांना सांगायचे आहे की, तुमच्यावर कोणी रंग टाकला तरी रमजानचा महिना आहे, त्यामुळे धीर धरा.
ते म्हणाले, भांडण करू नका, नमाज पढून घरी जा. देशात परस्पर बंधुभाव वाढावा, भांडणे होऊ नयेत, अशी माझी इच्छा आहे.