अबब..!! व्हेलच्या उलट्यांची तस्करी.. सोन्याची किंवा हिऱ्यापेक्षा किंमत जास्त,पोलिसांनी 3 जणांना अटक केली
Kalyan Whale Vomit Smuggling : व्हेल माशाच्या उलटीसह तीन तस्करांना गुन्हे शाखा-3, कल्याण अटक केली आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या उलट्यांची किंमत करोडो रुपये आहे.
कल्याण :- गुन्हे शाखा-3, Kalyan Crime Branch 3 कल्याण तीन तस्करांना अटक केली Kalyan Police Arrested Criminal आहे. त्यांच्यावर अंबरग्रीस म्हणजेच व्हेल माशांच्या उलट्या तस्करी केल्याचा Kalyan Whale Vomit Smuggling आरोप आहे. अंबरग्रीसची किंमत करोडो रुपये असल्याचे सांगितले जाते. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल भोसले (वय 55 रा. न्यू पनवेल सेक्टर 5), अंकुश शंकर माळी (वय 45 रा. रसायनी पनवेल) आणि लक्ष्मण शंकर पाटील (वय 63 रा. एमआयडीसी तलोजा नवी मुंबई)अशी आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखा -3 कल्याण कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले की, 27 सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोंसले यांना गुप्त माहिती मिळाली होती. काही लोक दुपारी दोनच्या सुमारास वॅगनआर कारमधून व्हेलच्या उलट्या विकण्यासाठी मौर्या धाब्याच्या बाजूला, बदलापुर पाईपलाईन रोड, मानपाडा, डोंबीवली पुर्व येथे येणार आहेत. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून वॅगनआर कारमधून बॅगेत ठेवलेला अंबरग्रीस जप्त केला. Kalyan Crime News
व्हेलच्या उलटीला एम्बरग्रीस देखील म्हणतात. स्पर्म व्हेल माशाच्या एका खास प्रकारची ही उलटी आहे. त्याला तरंगणारे सोने असेही म्हणतात. व्हेलची उलटी मेणाच्या घन दगडासारखी दिसते आणि त्याचा रंग राखाडी किंवा काळा असतो, जो माशांच्या आतड्यांमधून बाहेर पडतो. या उलटीची किंमत सोने आणि हिऱ्यांपेक्षा जास्त आहे. साधारणतः आरोपींकडे पाच किलो 642 ग्रॅम उलटी ची किंमत अंदाज आहे सहा कोटी 22 लाख 12 हजार एवढी आहे. Kalyan Crime News
परफ्यूम उत्पादक कंपन्यांमध्ये याला मोठी मागणी आहे. याचा उपयोग परफ्यूमला दीर्घकाळ सुरक्षित आणि सुगंधित ठेवण्यासाठी केला जातो. त्यामुळे कंपन्या त्यासाठी जास्त किंमत मोजायला तयार आहेत.त्यामुळे कंपन्या त्यासाठी जास्त किंमत मोजायला तयार आहेत. याशिवाय व्हेलच्या उलटीचा वापर औषधे बनवण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर महागडी दारू आणि सिगारेट बनवण्यातही त्याचा उपयोग होतो. Kalyan Crime News
पोलीस पथक
पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, (शोध 1) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, संदिप चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, पोलीस हवालदार विश्वास माने,विलास कडु, शिपाई गुरूनाथ जरग, पमिथुन राठोड, गोरक्ष शेकडे यांनी केलेली आहे Kalyan Crime News