•उद्धव बाळासाहेब ठाकरे गडाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे
मुंबई :- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मागील काही महिन्यांपासून दिग्गज नेत्यांनी सातत्याने दगाबाजी करत पक्ष सोडत आहे. ठाकरेंचे एकदम जवळची समजले जाणारे रवींद्र वायकर यांनीही ठाकरेंची साथ सोडले आहे.लोकसभा निवडणूक जाहीर झाली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिंदे गटाकडून पुन्हा धक्का बसला आहे. विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी रविवारी (17 मार्च) रोजी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. Aamshya Padavi In Shinde Gat
पाडवी आणि सचिन अहिर यांची विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर शिवसेनेला खिंडार पडले होते. निकाल जाहीर होताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदार सुरत आणि नंतर गुवाहाटीकडे रवाना झाले होते. आमश्या पाडवी यांनी मात्र उद्धव ठाकरेंबरोबर राहाणे पसंत केले होते. Aamshya Padavi In Shinde Gat
कोण आहेत आमश्या पाडवी
आमश्या पाडवी हे शिवसेनेच्या नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी चेहरा म्हणून अशी त्यांची ओळख आहे. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना पक्ष रुजवण्यात त्यांनी परिश्रम घेतले होते. 2022 साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षातील अनेक बड्या नेत्यांना बाजूला सारत आमश्या पाडवी यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर 40 आमदार त्यांच्यासोबत गेले. मात्र, पाडवी ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले होते. मात्र, आता त्यांच्या देखील शिंदे गटखत प्रवेश केला आहे.आमश्या पाडवी यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 मध्ये आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमशा पाडवी यांनी 80,777 मते घेतली होती. Aamshya Padavi In Shinde Gat
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…