ठाणे

Aaditya Thackeray : ‘व्होट चोरी म्हणजे निवडणूक चोरी’; वरळीतील मतदार यादीत मोठा घोळ – आदित्य ठाकरे यांचा भाजप-शिंदे सरकारवर गंभीर आरोप

Aditya Thackeray Target BJP And Shinde Shivsena : एकाच खोलीत 38 मतदार, लिंग चुकीचे दाखवले; आमदार आदित्य ठाकरे यांचे पुराव्यासह सादरीकरण

मुंबई :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विशेषतः मुंबई महानगरपालिका जिंकण्याच्या तयारीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने वरळी येथील NSCI डोममध्ये ‘संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा’ या टॅगलाईनखाली निर्धार मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात आमदार आदित्य ठाकरे MLA Aaditya Thackeray यांनी सादर केलेल्या एका विशेष सादरीकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले. त्यांनी थेट मतदार याद्यांमध्ये मोठा ‘कथित घोळ’ असल्याचा दावा करत, पुराव्यांसह गंभीर आरोप केले.

मतदार याद्यांमधील अनियमितता

आदित्य ठाकरे यांनी मेळाव्याच्या सुरुवातीलाच सादरीकरण सादर केले, ज्यात त्यांनी सादर केलेले आकडे, फोटो आणि मतदान कार्डांचे नमुने चर्चेचा विषय ठरले. त्यांनी गटप्रमुखांना सूचना देत म्हटले की, “आपण निवडणुकांची वाट पाहत बसू नका, व्होट चोरी म्हणजेच निवडणूक चोरी आहे.”

लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार येईल, असे वाटत असताना मतदानाची चोरी झाली, असा आरोप त्यांनी केला. मतदारांना EVM किंवा VVPAT मध्ये गडबड वाटत होती, पण आता मतदार याद्यांमध्येच गडबड असल्याचे समोर आले आहे, असे ते म्हणाले.

वरळीतील धक्कादायक आकडेवारी

आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघाचा आधार घेत मतदार यादीतील विसंगती दाखवून दिल्या:

लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत 16,043 मतांची वाढ झाली.

वरळी मतदारसंघात 19,333 मतदारांच्या संदर्भात गडबड आढळली.

विशेष म्हणजे, 502 मतदार असे आहेत ज्यांची नावे जवळपास सारखीच आहेत. एका उदाहरणात, गिरीश गजानन म्हात्रे नावाच्या मतदाराच्या वडिलांचे नाव भानजी पटेल असे आढळले.

643 मतदारांचे लिंग (Gender) चुकीचे दर्शवले गेले आहे, तर गौरी गगन गुप्ता, तेजश्री हडकर यांसारख्या महिला मतदारांचे लिंग पुरुष असल्याचे दाखवले आहे.

एकाच पत्त्यावर 38 मतदार!

आदित्य ठाकरे यांनी सादर केलेल्या पुराव्यांनुसार, वरळीत 4177 मतदार असे आहेत ज्यांचा कोणताही ठावठिकाणा नाही. 67 मतदारांच्या घराचा पत्ता केवळ ‘झो झो झो’ असा लिहिला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एकाच खोलीत 38 मतदार राहत असल्याचे दाखवण्यात आले आहे. काही मतदान कार्डांवर मतदारांचे फोटोच नाहीत, तर काही ठिकाणी मृत मतदारांची नावेही यादीत कायम आहेत.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago