Aaditya Thackeray Tweet : अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्ट मधून जामीन मिळाल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, ‘भारत युती…’
Aaditya Thackeray Tweet For Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. आता यावर उद्धव ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
ANI :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटकेनंतर 51 दिवसांनी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मद्य धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 1 जूनपर्यंत हा जामीन मंजूर केला आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आपला ट्विटमध्ये (Aditya Thackeray Tweet) म्हणतात की,अरविंद केजरीवाल जी यांना देशात हुकूमशाही राजवटीविरुद्ध न्याय आणि दिलासा मिळणे हे बदलाच्या वाऱ्याचे मोठे लक्षण आहे.ते खरे बोलत आहेत आणि तेच भाजपला आवडत नाही.त्याला आणि भारताच्या युतीसाठी अधिक शक्ती.आम्ही आमच्या संविधानाचे आणि लोकशाहीचे रक्षण करू! Maharashtra Lok Sabha Live Updates
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालय एक जून पर्यंत अंतरिम मंजुरी मिळाली आहे. केजरीवाल यांना प्रचार करीता सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले आहे. Maharashtra Lok Sabha Live Updates