Aaditya Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची मुंबई महानगरपालिका आयुक्तांना आव्हान
Aaditya Thackeray Told Mumbai BMC Commissioner To Hold Press Conference : पाणी प्रश्नावर आदित्य ठाकरे आक्रमक, महापालिका आयुक्तांना पत्रकार परिषद घेण्याचे दिला सल्ला
मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांनी मुंबईत पाणी प्रश्नावरून थेट महापालिकेच्या आयुक्तांनाच Mumbai BMC Commissioner आव्हान दिले आहे. महापालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईत पाणी कमी का येते तसेच मुंबईत गडुळ पाणी का येते यांसारख्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे आव्हान दिले आहे. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर या भागात गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच कमी पाण्यामुळे मे महिन्यात महानगरपालिकेने मुंबईचे पाणी कपात केले होते. या सर्व मुद्द्यांवर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांना पाण्यासंदर्भातील समस्या सांगावे असे ट्विट करून आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांना सल्ला दिला आहे.
आदित्य ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की,गेल्या काही दिवसांपासून, मुंबईकर एकतर गढूळ पाणी किंवा अशुद्ध पाण्याच्या तक्रारी करत आहेत ज्यामुळे पोटात किडे आणि अस्वस्थता येते. काही वॉर्डांमध्ये पूर्वीपेक्षा कमी दाबाने पाणी आले आहे. संपूर्ण मुंबईतून इतक्या मोठ्या संख्येने तक्रारी आल्याचे महापालिका आणि राज्य शासन मुंबईबद्दल इतके बेफिकीर आणि बेफिकीर असल्याचे मी प्रथमच पाहिले आहे. उन्हाळ्यात मुंबईकरांना कमी पाणी मिळाले. आता पुन्हा अनेक इमारतींना कमी पाणी मिळत आहे. मी मालिका आयुक्तांना एक पत्रकार परिषद घेण्याची खुली मागणी करत आहे आणि आम्हा सर्वांना सांगावे की मुंबईला हे घाण पाणी किंवा कमी पाणी का मिळत आहे, अनुक्रमे संपूर्ण शहरातून… त्यांना जाब विचारणारे मुंबईकर त्यांच्या दारात उभे राहायचे नाहीत. महापालिका आयुक्तांनी स्वत: ही पत्रकार परिषद घेतली तर उत्तम.