Aaditya Thackeray: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेचे चौकशी बाबत केली मागणी
केंद्रीय निवडणूक आयोगाने महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या बदलीबाबत सूचना दिल्यानंतर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे जोरदार टीका
मुंबई :- केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील ज्या सनदी अधिकाऱ्यांचा पदभार संपला आहे त्यांच्या बदलीचे निर्देश दिले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित करत बदली झाली आता चौकशी करा अशी मागणी केली आहे. तर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या पत्राच्या पाठपुरावर यश आली आहे असे म्हटले आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे काय म्हणाले?
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला मुंबईच्या आयुक्तांची बदली करण्याचे निर्देश दिले होते, तरीही मिंधे सरकार गप्पच राहिले.अखेर निवडणूक आयोगाने आज मुंबईच्या आयुक्तांना हटवले.
उशीरच झाला, पण निदान योग्य निर्णय झाला…तरीही मुंबई महानगरपालिकेत गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी केलेल्या प्रत्येक घोटाळ्याची चौकशी केली जावी आणि जनतेच्या कराच्या पै अन् पै चा हिशोब केला जावा अशी आमची मागणी आहे!
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मुंबई महानगर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या बदलीचे आदेश काढले.नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. पण सत्ताधाऱ्यांच्याच आशीर्वादाने कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही महत्वाच्या खुर्चीवर ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई कशी होणार ? त्यामुळे निवडणूक आयोगाला पत्र लिहून इकबाल सिंग चहल आणि इतर अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी केली होती. तीन वेळा पाठपुरवठा केल्यावर आज अखेरीस त्या मागणीला आज यश आले!