Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र, “ही” मागणी केली…
Aaditya Thackeray Write Letter To Ramesh Bais : शिवसेना युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी गोखले फुलाच्या संदर्भात राज्यपालांना पत्र
मुंबई :– युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे. राज्यपाल रमेश बैस Ramesh Bais यांच्याकडे त्यांनी यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. अंधेरी येथील गोखले Gokhale Road Bridge पुलाच्या पुनर्बाधणीच्या चुकीला इक्बालसिंह चहल जबाबदार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
गोखले पुलाचे बांधकाम Gokhale Road Bridge चुकल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला पूल एकमेकांना जोडणे शक्य नसल्याचे दिसून आले आहे. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना हे पत्र दिले आहे.
आदित्य ठाकरे यांनी पत्रात काय म्हटलंय ?
महापालिका आयुक्त चहल आणि रेल्वेच्या समकक्ष अधिकाऱयांच्या निलंबनाचे आदेश जारी करावेत, जेणेकरुन त्यांना या प्रकल्पात हस्तक्षेप करून गडबड करता येणार नाही आणि निर्लज्जपणे करदात्यांच्या कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी केल्याबद्दल निष्पक्ष चौकशीला सामोरे जाता येईल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.आयुक्तांची बदली प्रदीर्घ काळापासून रखडलेली तसेच मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची बदली प्रदीर्घ काळापासून रखडलेली आहे आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानंतरही घटनाबाह्य मुख्यमंत्री निवडणूक आयोगाला गृहीत धरत आयुक्तांची बदली करणे टाळत आहेत, याकडेही आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांचे लक्ष वेधले आहे.राजकारणी-अधिकारी-कंत्राटदारांचे संगनमत Aaditya Thackeray Write Letter To Ramesh Bais
दरम्यान, गोखले पूल हे राजकारणी अधिकारी-पंत्राटदार यांच्या संगनमताचे ढळढळीत उदाहरण आहे. स्थानिक आमदारांनी अधिकाऱयांसह या पुलाला अनेकदा भेट दिली होती, त्यावेळी त्यांना दोष दिसला नाही का? की तो तोडून पुन्हा दुसरा पूल बांधण्यासाठी मुद्दाम हा दोष निर्माण करण्यात आला? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे. Aaditya Thackeray Write Letter To Ramesh Bais
दरम्यान, गोखले पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने 7 नोव्हेंबर 2022 रोजी वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला. त्यानंतर पश्चिम रेल्वे व महापालिकेने समन्वय साधत 1 एप्रिल 2023 पासून गोखले पुलाचे काम सुरू केले. रविवार, 25 फेब्रुवारी रोजी गोखले पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. मात्र, गोखले पुलाची उंची दीड ते पावणेदोन मीटरने वाढ झाल्याने पालिकेसाठी मोठे आव्हान उभे ठाकले आहे. Aaditya Thackeray Write Letter To Ramesh Bais