Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी, शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड
Aaditya Thackeray : उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले की, त्यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
मुंबई :- उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांची शिवसेना (ठाकरे) विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे. मुंबईतील आमदारांच्या बैठकीनंतर पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली आहे. सोमवारी (25 नोव्हेंबर) उद्धव ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पक्षाच्या आमदारांच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना पक्षाचे ज्येष्ठ नेते अंबादास दानवे यांनीही सांगितले की, माजी मंत्री भास्कर जाधव यांची विधानसभेतील पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे, तर सुनील प्रभू यांची पक्षाच्या मुख्य प्रतोकपदी निवड करण्यात आली आहे. .