मुंबई

Aaditya Thackeray : “बेस्ट”आर्थिक संकटात, आदित्य ठाकरे यांचे महापालिकेच्या आयुक्तांना पत्र, आर्थिक अडचणीत आलेली बस सेवा कोलमडून पाडायचे सरकारचा डाव

Aaditya Thackeray’s letter to Municipal Commissioner : “बेस्ट”बसेस मुंबईकरांची जीवनवाहिनी आणि मुंबईकर म्हणून मला अभिमान आहे ; आदित्य ठाकरे

मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांनी मुंबई महानगरपालिकेच्या Municipal Commissioner आयुक्तांना पत्र लिहिले आहे. बेस्ट वर आलेले आर्थिक संकट लक्षात घेऊन आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता पत्र लिहिले आहे. आर्थिक अडचणीत आलेली बेस्ट सेवा कोल म्हणून पाडण्याचे सरकारचा डाव असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. तर बेस्ट बसेस Best BUS मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे आणि मुंबईकर म्हणून मला अभिमान आहे असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात लिहून मुंबई महानगरपालिकेचे Mumbai BMC आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे बेस्ट बसेस बाबत विविध मागण्या केल्या आहे.

आदित्य ठाकरे आपल्या पत्रात लिहितात की

मुंबईची जीवनवाहिनी आणि मुंबईकरांचा अभिमान असलेली ‘बेस्ट’ बससेवा आर्थिक अडचणीत आहे. परंतु तिला पूर्वी मान्य केलेले आर्थिक सहाय्य करायला मुंबई महानगरपालिकेने नकार दिल्याचे समजले. लाखो मुंबईकरांना दरोरोज इच्छित स्थळी पोहोचवणारी जगातील सर्वात स्वस्त आणि आधुनिक आरामदायी बससेवा अशी ‘बेस्ट’ची ओळख होती. तिच्या आधुनिकीकरणासाठी, इंधन बचतीसाठी आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस आणण्याची संकल्पना राबवण्याचे कार्य माझ्या हातून होऊ शकले ह्याचा मुंबईकर म्हणून मला अभिमान आहे.

परंतु गेल्या दोन वर्षांच्या काळात मुंबईच्या ह्या बससेवेकडे प्रशासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे असे जाणवले. आर्थिक अडचणीत आलेली बससेवा कोलमडून पडण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम मुंबईकरांच्या जीवनमानावर होणार आहे. जर मुंबई महानगरपालिका MMRDA सारख्या संस्थेला आर्थिक सहाय्य करु शकते, तर ‘बेस्ट’ बस सेवेलाही आर्थिक सहाय्य मिळायलाच हवे! ह्याबाबत आमच्या आपणासमोर काही मागण्या आहेत, ज्यांचा तातडीने आणि गांभीर्याने विचार केला जावा.

1.बेस्ट सेवेला मुंबई महानगरपालिकेने आर्थिक सहाय्य करावे.

2.बेस्टची भाडेवाढ केली जाऊ नये.बेस्ट कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार आणि पेन्शन मिळत रहावी, तारिख चुकवली जाऊ नये.

3.बसच्या संख्येतली नियोजित वाढ तातडीने आमलात आणली जावी.

वरील सर्व मागण्या ह्या मुंबईकरांचा प्रतिनिधी म्हणून मी आपणासमोर ठेवत आहे. मुंबईकरांसाठी महत्वाच्या असलेल्या ‘बेस्ट’ बससेवेचे खच्चीकरण केले जाऊ नये, अशी आमची इच्छा आहे. मिंधे राजवटीचा ‘बेस्ट’ बससेवा संपवून त्यांच्या कुठल्या कंत्राटदार मित्रांच्या खाजगी सेवेत चालना देण्याचा डाव नसेल, तर आपण ह्या वरील सर्व मागण्या तातडीने पूर्ण कराल आणि मुंबईकरांची ‘बेस्ट’ संकटातून बाहेर काढाल, अशी आशा आहे. (Aditya Thackeray’s letter to Municipal Commissioner)

असे मागण्याचे पत्र आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना लिहिलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0