मुंबई
Trending

Aaditya Thackeray : पार्ट्यांमध्ये जाण्यावर बंदी, एकनाथ शिंदे गटापासून दूर… ऑपरेशन टायगरनंतर आदित्य ठाकरेंचा नेत्यांना सल्ला

Aaditya Thackeray Latest Update : ऑपरेशन टायगरवरून शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये वाद सुरूच आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे गुरुवारी दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा संदेश खासदारांना दिला आणि सल्लाही दिला.

ANI :- ऑपरेशन टायगरवरून शिवसेना उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये वाद सुरूच आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे Aaditya Thackeray गुरुवारी दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा संदेश खासदारांना दिला आणि सल्लाही दिला.यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा संदेश खासदारांना दिला आणि सल्लाही दिला. कोणत्याही प्रकारची भाषणबाजी टाळण्यास सांगितले.

पक्षाला न सांगता कोणत्याही डिनर किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, तसेच एनडीएच्या नेत्यांपासून, विशेषत: एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांपासून अंतर राखावे, असे आदित्य ठाकरे यांनी खासदारांना सांगितले. यासोबतच त्यांनी खासदारांना पक्षशिस्त पाळण्यास सांगितले.उद्धव गटाच्या सर्व खासदारांनी संसदेच्या अधिवेशनात एकत्र राहून आपापसात समन्वय ठेवावा, असे ठाकरे म्हणाले.

ऑपरेशन टायगरवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना सातत्याने धक्के देत आहेत.एकनाथ शिंदे राज्यात ऑपरेशन टायगर चालवत असल्याच्या बातम्या येत आहेत, त्याअंतर्गत अनेक ठाकरे गटाचे नेते शिंदे यांच्या पक्षात सामील होऊ शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0