ठाणे

हिरानंदानी ठाणे येथे इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या!

•ठाण्याच्या हिरानंदानी येथील इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून उडी मारून 45 वर्षीय महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे :- हिरानंदानी इस्टेट येथील पेनिकल इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून उडी मारून 45 वर्षीय महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उडी मारल्यानंतर महिलेचा जागीच मृत्यू झाला असून महिलेला सिविल रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी नेण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31ऑक्टोबर सकाळच्या सुमारास हिरानंदानी इस्टेट ठाणे येथील पेनिकल इमारतीच्या 22व्या मजल्यावरून एका महिलेने उडी मारून आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता महिलेचा जागीच मृत्यू झाला होता तसेच महिलेला पोस्टमार्टमकरिता ठाण्याच्या सिविल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी महिलेच्या नातेवाईकांकडून चौकशी केली असता ही महिला पेनिकल इमारतीमध्ये तेल मालिशचे काम करण्याकरिता येत असे या महिलेच्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करण्याचा एक्सेस असल्यामुळे महिलेने इमारतीच्या रेफ्यूजी एरियात जाऊन 22 व्या मजल्यावरून उडी मारले आहे. असे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. महिले संदर्भात नातेवाईकांकडे अधिक चौकशी केली असता महिलेचा पती किडनीच्या आजाराने ग्रस्त असून मुलालाही डोळ्यांचा विकार असल्यामुळे या कारणास्त महिलेने आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. कासारवडवली पोलिसांकडून संपूर्ण चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेची पडताळणी करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0