क्राईम न्यूज

मुंबईत ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल: उद्यानात खेळायला नेऊन चिमुरडीवर अत्याचार, आरोपीला अटक!

Mumbai Latest Crime News : भावाला खाऊ आणायला पाठवून नराधमाचे कृत्य; जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडिता धास्तावली

मुंबई: उद्यानात खेळायला नेण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ॲन्टॉपहिल पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने पीडित मुलीला दिली होती. या गंभीर प्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. Mumbai Latest POSCO Crime News

नेमके काय घडले?

दहा वर्षांची पीडित मुलगी आणि तिचा अल्पवयीन भाऊ घराशेजारी खेळत होते. त्यावेळी आरोपीने त्यांना जवळच्या उद्यानात खेळायला नेण्याचे आमिष दाखवले. मुले तयार झाल्यानंतर आरोपी त्यांना घेऊन उद्यानात गेला. तेथे आरोपीने पीडित मुलीच्या भावाला खाऊ आणण्यासाठी उद्यानाच्या बाहेर पाठवले. मुलीसोबत कोणी नसल्याचा फायदा उचलून नराधम आरोपीने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. त्यानंतर, हा प्रकार कोणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी आरोपीने पीडित मुलीला दिली, त्यामुळे ती प्रचंड घाबरली होती.

भीतीमुळे पीडित मुलीने सुरुवातीला हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, नुकताच तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर आईने तात्काळ अॅन्टॉपहिल पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, हा धक्कादायक प्रकार 20 जुलै ते 26 जुलै या कालावधीत घडला.

पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक करण्यासाठी पथक पाठवले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे शहरात अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago