क्राईम न्यूजठाणेमहाराष्ट्रमुंबई
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील गोदामात चोरी व आग लावल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल
पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही
नवी मुंबई – शनिवार २ मार्च रोजी नवी मुंबईतील गोदामातून चोरी आणि आग लावल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली. उरण पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. Navi Mumbai Crime News
आगीत १५ कोटींहून अधिक किमतीचा माल जळून खाक झाला
७ आणि ८ जानेवारीच्या मध्यरात्री आरोपींनी उरणमधील कांठवली येथील गोदामातून १.९७ कोटी रुपयांची सुपारी चोरून नेली आणि नंतर चोरी लपवण्यासाठी आवारात आग लावल्याची घटना घडली, असे त्यांनी सांगितले. या आगीत १५ कोटींहून अधिक किमतीचा माल जळून खाक झाला, असे अधिका-यांनी सांगितले, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. Navi Mumbai Crime News