ACB Bribe Trap : नो पार्किंगमध्ये उचललेली गाडी सोडण्यासाठी ‘इतक्या’ रुपयांची घेतली लाच; सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला अटक
ACB Police Arrested Traffic Police Officer For Taking Bribe : छावणी पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप रामराव चव्हाण याला लाच लुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
छत्रपती संभाजीनगर :- जिल्हा सत्र न्यायालय बिल्डिंग समोरील नो पार्किंग No Parking ठिकाणी पार्किंग केलेल्या वाहन सोडवण्यासाठी छावणी पोलीस ठाण्याच्या Chavani Police Station शहर वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप रामराव चव्हाण (51 वय) यांना 500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. Traffic Officer Taking Bribe
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार यांची मोटरसायकल वाहन क्रमांक MH20 G F 5702 जिल्हा सत्र न्यायालय बिल्डिंग समोरील रोडवर (9 डिसेंबर) रोजी पार्किंग केली होती. वाहन हे शहर वाहतूक लिफ्टिंग व्हॅन ने उचलून छावणी येथील छावणी ग्राउंड वाहनतळ येथे आणले होते. वाहन सोडवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे प्रदीप चव्हाण यांनी 1200 रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती पंच साक्षीदार समक्ष 700 रुपयांची लाचेची मागणी करून त्यातील दोनशे रुपयांची कायदेशीर पावती देऊन पाचशे रुपयांची लाचेची रक्कम पंच साक्षीदारा समक्ष लाच स्वीकारली असता प्रदीप चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले आहे. छावणी पोलीस ठाणे,छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला प्र. वि छत्रपती संभाजीनगर ,मुकुंद अघाव, अप्पर पोलीस अधीक्षक ला. प्र .वि. छत्रपती संभाजी नगर , सुरेश नाईकनवरे पोलीस उपाधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीलाल चव्हाण पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर पोलीस हवालदार रवींद्र काळे, साईनाथ तोडकर, सी एन बागुल ला. प्र. वि.छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.