Anil Parab Book : शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे उमेदवार अनिल परब यांच्या “संकल्प पत्रा” पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
•मुंबईतून महाविकास आघाडीच्या आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून ॲड. अनिल परब यांना उमेदवारी जाहीर झाली आहे
मुंबई :- पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांचे अतिशय निकटवर्गीय म्हणून बांधले जाणारे ॲड. अनिल परब यांना महाविकास आघाडी कडून शिवसेनेचे ठाकरे गटाचे मुंबई पदवीधर मतदार संघाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. पक्ष फुटी नंतर सातत्याने विरोधकांवर हल्लाबोल करणारे तसेच उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांची भूमिका ठामपणे समोर मांडणारे एक सुशिक्षित नेता अशी अनिल परब यांची ओळख आहे. अनिल परब यांना यंदाच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनिल परब यांच्या “संकल्प पत्रा” याचे प्रकाशन करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या यशानंतर विधानसभेची तयारीला लागल्या असून तत्पूर्वी महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाले आहे.
मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा 4 जागांकरिता निवडणूक होत आहे. 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे, तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.
मुंबई पदवीधर लढत
किरण शेलार (भाजप) विरुद्ध अनिल परब (शिवसेना ठाकरे गट ) विरुद्ध दिपक सावंत (शिवसेना)
कोण आहे अनिल परब?
अनिल परब हे महाराष्ट्र विधान परिषदेत तीन वेळा शिवसेनेचे आमदार आहेत. डिसेंबर 2019 मध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश केला होता. पेशाने वकील असलेले परब हे ठाकरे घराण्याच्या निष्ठावंतांपैकी एक आहेत. ते पक्षाचे कायदेशीर मुद्दे हाताळतात आणि नागरी निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अनिल परब हे 2001 पासून विभाग प्रमुख (विभाग प्रमुख) आहेत आणि दोन विभागांची जबाबदारी सोपवलेले ते एकमेव नेते आहेत.