मुंबई

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या खासदार रवींद्र वायकर यांचा, विजय मॅनेज पोलीस ठाण्यात तक्रार

• Maharashtra Politics दोन पक्षांच्या उमेदवारांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह आणि जनाधार पार्टीचे उमेदवार अरोरा सुरिंदर मोहन यांनी ही तक्रार केली आहे.

मुंबई :- उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकाल सर्वाधित चर्चेत राहिला. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर आणि शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात चुरशीची लढाई झाली. या मतदार संघात इव्हीएम मशिनमधील मतमोजणीत रवींद्र वायकर फक्त एका मताने आघाडीवर होते. परंतु पोस्टल बॅलेटमध्ये त्यांना 47 मतांची मदत झाली आणि त्यांनी अमोल किर्तीकर यांना 48 मतांनी पराभूत केले. परंतु त्यांच्या या विजयावरुन अजूनही वाद सुरु आहे. आता दोन पक्षांनी त्यांचा विजय मॅनेज असल्याचा आरोप करत थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांचा विजय मॅनेज आहे, असा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दोन पक्षांच्या उमेदवारांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह आणि जनाधार पार्टीचे उमेदवार अरोरा सुरिंदर मोहन यांनी ही तक्रार केली आहे. आपल्यासोबत अपक्ष उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मतमोजणी केंद्रांवर मोबाईलसाठी बंदी होती. त्यानंतर केंद्रावर रवींद्र वायकर यांच्या गटाकडून मोबाईल वापरला, असा आरोप या दोन्ही उमेदवारांनी केला आहे. या ठिकाणी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

रवींद्र वायकर यांच्या विजयावर यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता. या निकालाविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली. आता आणखी दोन पक्षांनी या विजयासंदर्भात आरोप केले आहे. यामुळे रवींद्र वायकर यांच्यासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0