Maharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरेंची मनसे गायब? शपथविधीसाठी निमंत्रण मिळाले पण…
Maharashtra Assembly Election 2024 : काल मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहिले नाहीत. यावर मनसे अध्यक्षांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मुंबई :- लोकसभा निवडणुकीनंतर Maharashtra Assembly Election 2024 आता सर्वांच्या नजरा विधानसभा निवडणुकीकडे लागल्या आहेत. दरम्यान, राज ठाकरेंबाबत Raj Thackeray नवी चर्चा सुरू झाली आहे. मोदी सरकार 3.0 च्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मनसे अध्यक्षांना मिळाले होते, मात्र ते या सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. मात्र, यामागचे कारण त्यांनी वैयक्तिक असल्याचे सांगितले आहे.मोदी 3.0 च्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरेंनी का हजेरी लावली नाही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता त्याची पुढची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे यांनी एनडीए सरकारला तसेच राज्यातील महायुती सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे राज्यभरातून विरोधकांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. राज ठाकरे यांनी प्रचारादरम्यान महायुतीच्या उमेदवारांकरिता पाच ते सहा सभा घेतले होत्या ज्यामध्ये कोकण, पुणे, मुंबई, ठाणे यांसारख्या ठिकाणी राज ठाकरे यांनी सभा घेऊन तेथील उमेदवार विजय झाल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेने यांच्याकडून सांगितले जात आहे. राज ठाकरे हे सुद्धा एनडीएचा भाग असल्यामुळे कालच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण असल्याचे सांगितले जात आहे. परंतु वैयक्तिक कारणामुळे राज ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही असे सांगितले जात आहे.
विधान परिषदेच्या चार जागे करिता राज ठाकरे यांच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली परंतु असे देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील जागे करिता राज ठाकरे यांच्या पक्ष म्हणून पुन्हा एकदा माघार घेण्यात आली राज ठाकरे यांच्या माघारी नंतर त्यांच्यावर विरोधकांकडून सडकून टीका करण्यात आली आहे. Maharashtra Assembly Election 2024 News Updates
Web Title : Maharashtra Assembly Election 2024: Raj Thackeray’s MNS Disappears? Got an invitation for the oath ceremony but…