Pune Crime News : लाचखोरी प्रकरणात न्यायाधीश आणि सीबीआय अधिकाऱ्यांना मॅनेज करण्यासाठी वकील आणि लिपिक मागितली होती 27 लाखाची लाच
•लाचखोर वकील आणि लिपिक यांना पाच वर्षाची शिक्षा, न्यायाधीश आणि सीबीआय अधिकाऱ्याला मॅनेज करण्याचे दिले होते आश्वासन
पुणे :- हेमंत थोरात आणि लक्ष्मण देशमुख यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 8 नुसार दोषी ठरवत पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हेमंत थोरात हे वकील असून लक्ष्मण देशमुख हे लिपिक कर्मचारी आहे या दोघांवर कलम आठ नुसार दोषी ठरवले असून दोन्ही आरोपींना पाच वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच एक लाख रुपये दंड म्हणून दोन महिने तुरुंगवास भोगावे लागणार आहे.
या गुन्ह्यातील दोषी ठरलेल्या वकील आणि लिपिक त्यांना सहा महिन्याचा कारावास व दहा हजार रुपये ठोठविण्यात आला असून प्रत्येकी दहा हजार रुपये आणि ते पैसे न भरल्यास पंधरा दिवसाची तुरुंगवास भोगावे लागेल असे सांगण्यात आले होते.
2013 च्या दरम्यान संजय वी गोखले तात्कालीन निरीक्षक सीबीआय व एसीबी यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये वीरसिंग तात्कालीन मुख्य लोको इन्स्पेक्टर दौंड पुणे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. त्यांच्या चौकशीच्या दरम्यान खुलासा केला की 27 लाख रुपयांची मागणी करत वकील थोरात आणि लिपिक देशमुख यांनी लाचलुतपत प्रतिबंधक आणि सीबीआय अधिकारी आणि न्यायाधीशांना मॅनेज करू असे सांगून त्यांच्याकडून दोन लाख रुपये जामीन साठी द्यावे लागेल असे चौकशी दरम्यान वीर सिंग यांनी कबुली दिली. या घटनेवरून पोलिसांनी वकील आणि लिपिक यांच्यावर पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे.