Sanjay Raut : चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार हे आज तुमच्या सोबत आहे…उद्या आमच्या सोबत आहे… खासदार संजय राऊत
•कंगना राणौतला थप्पड मारल्याच्या घटनेवर संजय राऊत म्हणाले, ‘मला सहानुभूती आहे…’
नवी दिल्ली :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांची बोलताना म्हणाले की, नितेश कुमार आणि चंद्रबाबू नायडू आज तुमच्या सोबत आहे तर उद्या आमच्या सोबत असेल असा दावा संजय राऊत त्यांनी केला आहे. तसेच, मोदींना सरकार चालवतांना नाकीनऊ येणार आहे. तर अभिनेत्री कंगना राणौतला यांच्यासोबत घडलेल्या प्रकारावरही संजयराव त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे सर्वांचे एनडीएच्या बैठकीला महाराष्ट्रातील महायुतीचे खासदार दिल्ली पोहचले आहेत. याबाबत बोलतांना संजय राऊत म्हणाले, “त्यांना सरकार बनवू द्या, पण त्यांना सरकार चालवताना नाकीनऊ येतील. मुळात एनडीए आहे कुठे? चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे सर्वांचे आहेत. ते आज तुमचे आहेत, उद्या आमचे होतील. अग्नीवीर योजनेला जेडीयुने विरोध केला आहे. मोदींनी निवडणूक प्रचारात ज्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला, त्याला एनडीएतील लोकांनीच विरोध केला आहे. उद्या हे लोक राम मंदिरलाही विरोध करतील”, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
चंद्राबाबूही मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या समर्थनार्थ पुढे राऊत म्हणाले, “मोदी प्रचारात म्हणत होते की, काँग्रेस आणि ठाकरे गट सत्तेत आले तर मुस्लिमांना आरक्षण देतील. चंद्राबाबूही मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या समर्थनार्थ आहेत. त्यामुळे असे अनेक मुद्दे आहेत, ज्यावर चर्चा होणे बाकी आहे. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा म्हणेल की, सरकार बनवण्याचा अधिकार या लोकांचा आहे. मोदींकडे बहुमत नाही आहे. भाजपकडे बहुमत नाही आहे. मोदी बोलत होते, मी काँग्रेस मुक्त भारत करणार, पण आम्ही सर्वांनी मिळून बहुमत मुक्त भाजप बनवले आहे”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
कंगना राणौतला काल विमानतळावर सीआयएसएफ कॉन्स्टेबलने थप्पड मारली होती. या घटनेवर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे.खासदार संजय राऊत म्हणाले, “कोणाने कायदा हातात घेऊ नये, पण एका सैनिकाने आपल्या आईसाठी कायदा हातात घेतला आहे. त्याची आईही भारतमाता आहे आणि जे शेतकरी आंदोलनात बसले होते ते भारताचे पुत्र होते. माता, जर कोणी आईचा अपमान केला असेल तर मला वाटतं, मला कंगनाची सहानुभूती आहे, आपण अशा प्रकारे खासदारावर हात उचलू नये, तर देशात शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे.