आर्थिकमुंबई

Mumbai Business News : रेवफिनची ब्‍ल्‍यूव्‍हील्‍झ आणि कल्‍याणी पॉवरट्रेनसोबत हातमिळवणी

मुंबई : रेवफिन Revfin  या भारतातील शाश्‍वत गतीशीलतेमध्‍ये निपुण असलेल्‍या अग्रगण्‍य डिजिटल लेण्डिंग प्‍लॅटफॉर्मने भारतीय लॉजिस्टिक्‍स क्षेत्रात रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक ट्रक्‍स retrofitted electric trucks लाँच करण्‍यासाठी भारत फोर्ज लिमिटेडची इलेक्ट्रिक मोबिलिटी शाखा कल्‍याणी पॉवरट्रेन लि. (केपीटीएल) आणि शाश्‍वत लॉजिस्टिकल सोल्‍यूशन्‍स प्रदाता ब्‍लूव्‍हील्‍झ यांच्‍यासोबत सहयोगाची घोषणा केली आहे. कंपनीने सरकारी योजनांच्‍या पाठिंब्‍यासह आणि ओईएम व फ्लीट ऑपरेटर्ससोबत सहयोगाने पुढील पाच वर्षांमध्‍ये ट्रक ताफ्याचे १०० टक्‍के रूपांतरण करण्‍यासाठी नाविन्‍यपूर्ण आर्थिक उत्‍पादने डिझाइन केली आहेत. हा उपक्रम ईव्‍ही इकोसिस्‍टममध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यासह शाश्‍वत परिवहनाला चालना देण्‍याप्रती रेवफिनच्‍या मिशनशी संलग्‍न आहे. Mumbai Business News

रेवफिनचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व संस्‍थापक श्री. समीर अग्रवाल म्‍हणाले, ”आम्‍ही शाश्‍वत गतीशीलतेमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यासह ईव्‍ही इकोसिस्‍टमला प्रबळ करण्‍याप्रती समर्पित आहोत. रेट्रोफिटिंग जगभरात डिकार्बनायझेशन आणि निव्‍वळ-शून्‍य ध्‍येये संपादित करण्‍यासाठी महत्त्वाचे आहे, ज्‍यामुळे ईव्‍ही अवलंबन अधिक सुलभ होईल, तसेच हरित भविष्‍याला चालना मिळेल. रेट्रोफिटिंग वेईकलचा जीवनकाळ वाढवते, रिसायकलिंग तत्त्वांना एकत्र करते आणि कार्यसंचालन खर्च कमी करते. रेट्रोफिटेड वेईकल्‍सना अर्थसाह्य करत रेवफिन व्‍यापक शाश्‍वतता ध्‍येयांना पाठिंबा देते. पण, आम्‍ही नियमनांचे पालन करतो, ज्‍यामुळे रेट्रोफिटिंग प्रक्रिया सोपी होते आणि वाहन नोंदणी कालावधी १५ वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत विस्‍तारित होतो. बॅटरी जीवनकाळ विस्‍तारीकरणावरील सखोल संशोधन देखील या क्षेत्राला साह्य करेल. रेट्रोफिटिंगची व्‍याप्‍ती फक्‍त ताफ्यापुरती मर्यादित नसून स्‍कूल बसेस्, चार्टर्ड बसेस्, ट्रॅव्‍हल, पर्यटन अशा क्षेत्रांपर्यंत देखील विस्‍तारित होते.” Mumbai Business News

केपीटीएलने एन३ गूड्स कॅरिअर विभागासाठी १० ते १६ टन जीव्‍हीडब्‍ल्‍यू श्रेणीमध्‍ये यशस्‍वीरित्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक ट्रक्‍सचा समावेश केला आहे. हे ट्रक्‍स एफएमसीजी, ई-कॉमर्स, सिमेंट, स्‍टील व नाशवंत वस्‍तू अशा विविध विभागांना सेवा देण्‍यासाठी उत्तमरित्‍या डिझाइन करण्‍यात आले आहेत, ज्‍यामुळे जागतिक ऑटोमोटिव्‍ह बाजारपेठेसाठी ‘मेड इन इंडिया’ सोल्‍यूशन्‍सच्‍या उपलब्‍धतेमध्‍ये वाढ होत आहे. Mumbai Business News

केपीटीएलने एन३ गूड्स कॅरिअर विभागासाठी १० ते १६ टन जीव्‍हीडब्‍ल्‍यू श्रेणीमध्‍ये यशस्‍वीरित्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक ट्रक्‍सचा समावेश केला आहे. हे ट्रक्‍स एफएमसीजी, ई-कॉमर्स, सिमेंट, स्‍टील व नाशवंत वस्‍तू अशा विविध विभागांना सेवा देण्‍यासाठी उत्तमरित्‍या डिझाइन करण्‍यात आले आहेत, ज्‍यामुळे जागतिक ऑटोमोटिव्‍ह बाजारपेठेसाठी ‘मेड इन इंडिया’ सोल्‍यूशन्‍सच्‍या उपलब्‍धतेमध्‍ये वाढ होत आहे. Mumbai Business News

Web Title : Revfin joins hands with Bluewheels and Kalyani Powertrain

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0