Navi Mumbai Drug News : नवी मुंबईत, ड्रग्ज पेडलर पोलिसांच्या ताब्यात, एल. एस.डी. अंमली पदार्थांची करत होता विक्री
Navi Mumbai Drug News : अंमली पदार्थ विरोधी पथक नवी मुंबई यांची कारवाई ; अंमली पदार्थाचे विक्री करणाऱ्या आरोपी गजाआड
नवी मुंबई :- तरुणाई मध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्था व्यसनाधीन झाले आहे. ललित पाटील Lalit Patil Drug Case प्रकरण त्यानंतर महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज (अंमली) पदार्थाने Drug Addicted घेरलेले आहे असे लक्षात येते आहे. याकरिता पोलिसांनी चांगलाच कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस आयुक्त, नवी मुबंई, मिलिंद भारंबे यांनी नशामुक्त नवी मुंबई अभियान सुरु केले असून त्या अनुषंगाने पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे यांनी अवैध अंमली पदार्थाची तस्करी करणारे, खरेदी-विक्री तसेच सेवन करणाऱ्या पोलिसांनी सतर्क म्हणून बारकाईने नजर आहे. कामोठ्यातून एका ड्रग्ज पेडलर नवी मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने Navi Mumbai Anti Drug Squad अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एल.एस.डी हा Navi Mumbai Caught Drug अंमली पदार्थ जप्त केला आहे. अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. Navi Mumbai Drug News
पोलिसांना मिळाली गोपनीय माहिती
अंमली पदार्थ विरोधी पक्षाचे पोलीस नाईक संजय फुलकर यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीवरून नवी मुंबईच्या कामोठे सेक्टर 17 मोठा खांदागाव येथे रात्री आठ वाजेच्या सुमारास एल.एस.डी अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याचे खात्रीदायक माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव आर्यन कुरुवीटील असे असून हा गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ विक्री करत असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांकडून आरोपीच्या मूळ सूत्रधाराचा शोध घेतला जात असून यामागे कोणते मोठे रॅकेट आहे का याची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. Navi Mumbai Drug News
पोलीस पथकाची कारवाई
धनाजी क्षीरसागर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कोकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन श्रीकांत नायडू, पोलीस उपनिरीक्षक कुलदिप मोरे, पोलीस हवालदार रमेश तायडे, पोलीस नाईक संजय फुलकर, महिंद्र अहिरे, महिला पोलीस हवालदार हेमांगी पाटील या पथकाने ठिकाणी सापळा रचून असता आरोपी आर्यन बिर्जाय कुरुवीटील, (22 वर्षे), सेक्टर-21 कामोठे, नवी मुबंई याच्या ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन एकुण 2 लाख 85 हजार किंमतीचे 0.35 ग्रॅम वजनाचे “एल.एस.डी. पेपर हा अंमली पदार्थ मिळुन आला असुन त्याच्या विरुध्द कामोठे पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 22 (क), अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि सुधिर हिवाळे कामोठे पोलीस ठाणे हे करीत आहेत.Navi Mumbai Drug News
Web Title : Navi Mumbai Drug News : In Navi Mumbai, drug peddler in police custody, L. S.D. He was selling drugs