क्राईम न्यूजठाणे

Thane Crime News : घरफोडी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुस्क्या, टोळीकडून 43 मोबाईल सह आठ लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

Thane Crime Branch Arrested Burglary Criminal : ठाणे गुन्हे शाखा युनिट-1 उत्कृष्ट कामगिरी ; मोबाईल चोरी सह दरोडा घालणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश‌

ठाणे :- शहरामध्ये घरफोडी आणि मोबाईल चोरी Mobile Thief याच्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पोलिसांकडून ही गुन्हेगारी Thane Police रोखण्याकरिता सातत्याने अंकुश ठेवले जात आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-01 घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.चोरट्यांकडून 43 मोबाईल सह सोन्या चांदीचे दागिने असा एकूण आठ लाख 83 हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. Thane Latest Crime News

पोलिसांनी केला आरोपींच्या पर्दाफाश

गुन्हे शाखेचे युनिट-1 ठाणे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी राजदूत उर्फ इम्रान शेख उर्फ सागर (26 वर्ष) भिवंडी या आरोपीला पोलिसांनी 3 जून रोजी अटक केले आहे. शिळ डायघर पोलीस ठाणे भादवि कलम 457,380 गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कडून चाळीस हजार किंमतीचे चार मोबाईल हस्तगत केले आहे. Thane Latest Crime News

चार आरोपी अटक

पोलिसांनी मोठ्या कौशल्याने आरोपीकडून तपासणी केली असता त्यांनी 02 जुन रोजी अन्य ठिकाणी घरफोडी करणारे तीन आरोपींना अटक केली आहे.

आरोपींचे नावे

1) अख्तर हुसेन गुलाम मुर्तुजा खान उर्फ दारा, (25 वर्ष), भिवंडी, ठाणे, मुळ राह. उत्तरप्रदेश
2) मोहमद आलम मोहमद शमशुद्दीन, (19 वर्ष), नालासोपारा (पुर्व) मुळ रा.उत्तरप्रदेश,
3) मोहमद नौशाद कय्युम अन्सारी, (26 वर्ष), भिवंडी, ठाणे. मुळ राह. नवी दिल्ली यांची नावे निष्पन्न झाल्याने त्यांचेवर शिळ-डायघर पो.स्टे. गुन्हा भादंविसं कलम 380,411,34 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4,27 सह म.पो.का. कलम-37 (1)135 गुन्हा दाखल करुन या गुन्हयात अटक केली आहे. Thane Latest Crime News

अटक आरोपी पैकी आरोपी अख्तर हुसेन गुलाम मुर्तुजा खान उर्फ दारा, यांचेकडून घरफोडी व चोरी करण्यासाठी वापरत असलेले स्क्रु ड्रायव्हर, पक्कड व एक धारदार चॉपर असे साहीत्य हस्तगत करण्यात आले आहे. तसेच गुन्हयातील ठिकाणांवरून चोरी केलेले सोन्याचे दागिने व मोबाईल फोन चोरी करून अटक आरोपी क्रमांक 4) मोहंमद सर्फराज रेहमतअली खान उर्फ बब्बु, (28 वर्ष) रा- भिवंडी, जि. ठाणे यांस विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

आरोपींकडून मुद्देमाल जप्त

आरोपी यांचेकडून गुन्हयातील 1 लाख 05 हजार किंमतीचे 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 6 लाख 94 हजार किंमतीचे विविध कंपनीचे त्यामध्ये आय फोन 04, सॅमसंग 08, व्हीओ 08, ओप्पो 09, वन प्लस 02, नाझर्झा 02, रेड मी 02, मोटोरोला 02, एम. आय. 01, रियल मी 02, पोको 01, शाओमी 01 असे एकूण 43 मोबाईल फोन व 3 हजार 600 रोख रक्कम असे हस्तगत करण्यात आले आहे. Thane Latest Crime News

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिळडायघर पोलीस स्टेशन ठाणे शहर कडील एकुण 03 गुन्हे व मालवनी पोलीस ठाणे, मुंबई यांचेकडील 01 असे एकुण 04 गुन्हे उघडकीस आणले आहेत. तपासामध्ये अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक प्रकाश शिरसाठ हे करीत आहे.आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. अटक आरोपी पैकी आरोपी अख्तर हुसेन गुलाम मुर्तुजा खान उर्फ दारा, याच्या विरुध्द भिवंडी, डायघर, शांतीनगर पोलीस ठाण्यात एकूण 8 घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

Thane CP Ashutosh Dumbare
Thane CP Ashutosh Dumbare

पोलीस पथक

आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर Thane CP Ashutosh Dumbare , ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर, डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे निलेश सोनवणे, सपोआ, शोध-1 गुन्हे शाखा, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ, पोलीस हवालदार दिपक जाधव,नंदकुमार पाटील, अविनाश पाटील,प्रशांत निकुंभ, सुनिल माने, शब्बीर फरास, बाळु मुकणे, महिला पोलीस हवालदार उज्वला सावंत, महिला पोलीस शिपाई तेजश्री शेळके, पोलीस शिपाई सागर सुरळकर व पोलीस शिपाई विजय यादव, गुन्हे शाखा, घटक-1 ठाणे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : Thane Crime News : Burglar gang busted, 43 mobile phones worth more than eight lakhs seized from the gang

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0