क्रीडा

T20 World Cup : आयर्लंडनंतर पाकिस्तानचे टीम इंडियाला आव्हान, दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन अशी असू शकते

ICC T-20 World Cup :- भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाची शानदार सुरुवात केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्या सामन्यात आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजीला आलेला आयरिश संघ 16 षटकांत सर्वबाद 96 धावांत आटोपला. याला प्रत्युत्तरात भारताने 12.2 षटकांत 2 गडी गमावून सहज लक्ष्य गाठले. अशा प्रकारे भारतीय संघाने विजयाने सुरुवात केली. मात्र, आता क्रिकेट चाहत्यांच्या नजरा भारत-पाकिस्तान सामन्याकडे लागल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानचे संघ 9 जूनला आमनेसामने येणार आहेत. न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ भिडतील. T20 World Cup Latest News

भारत आणि पाकिस्तानचे प्लेइंग इलेव्हन कसे असेल?

पण यावेळी सर्वात मोठा प्रश्न हा आहे की भारत आणि पाकिस्तानचे प्लेइंग इलेव्हन काय असेल? दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता कायम आहे. उदाहरणार्थ, आयर्लंडविरुद्धच्या भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये यशस्वी जैस्वालचा समावेश नव्हता, पण यशस्वी जयस्वाल पाकिस्तानविरुद्ध खेळणार असल्याचे मानले जात आहे. याशिवाय भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही. T20 World Cup Latest News

भारतीय प्लेइंग इलेव्हन

  • रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

पाकिस्तानचे प्लेइंग इलेव्हन

  • बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद अमीर, हरिस रौफ आणि नसीम शाह.

भारत आणि पाकिस्तान 12 वेळा आमनेसामने आले आहेत. पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा वरचष्मा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. भारताने आत्तापर्यंत 9 वेळा टी-20 सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे. तर पाकिस्तानला भारताविरुद्ध केवळ तीन वेळा यश मिळाले आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानसाठी भारतीय संघाला पराभूत करणे सोपे जाणार नाही, हे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मात्र, या सामन्यात कोणत्या संघाला यश मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. T20 World Cup Latest News

Web Title : T20 World Cup: After Ireland, Pakistan’s challenge to Team India, the playing eleven of both teams can be

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0