Daund News : कुस्ती संघाच्या अध्यक्षपदावरुन युगेंद्र पवारांना हटविले
निकालाचा राग युगेंद्र पवार यांच्यावर चेर्चेला उधाण
दौंड प्रतिनिधी हरिभाऊ बळी
दौंड, ता. ६ बारामती लोकसभा निकालाने राज्यातील सत्ता समीकरणं बदलली आहेत. महाविकास आघाडीने महायुतीला मोठा झटका दिला आहे. डॅमेज कंट्रोल कसं करावं यासाठी डावपेच आखले जात आहेत. मंथन होत आहे. बैठकांच सञे सुरू आहेत. महाविकास आघाडीने मारलेली मुसंडी अनेक आमदारांसाठी अस्वस्थ करणारी ठरली आहे. राज्यात मोदी मॅजिकचा करिष्मा दिसला नाही. त्यातच बारामती मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यात निकालाचा राग युगेंद्र पवार यांच्यावर निघाल्याची चर्चेला उधाण आले आहे.
याप्रकरणी युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला काही सांगता येणार नाही. मला लोकांनी सांगितलंय की दोन दिवसांपूर्वी कुठेतरी एक मिटिंग झाली. ते माझ्या कानावर आले आहे.परंतु अजून पञ किंवा असं काय आलेलं नाही. जवळपास तीन चार वर्षांपासून कुस्ती संघाची जबाबदारी माझ्याकडे आहे. त्याअगोदर श्रीनिवास बापू बघत होते. तिथले पैलवान चांगली कामगिरी करत आहेत. दादानी पण तिथे खूप मदत केली आहे. तिथे इमारत दिली त्यामुळे पैलवानांना प्रोत्साहन मिळाले आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बारामतीत कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यावेळी शरद पवार आणि युगेंद्र पवार यांचेही फोटो झळकले होते. त्यावेळी कुस्तीचा एक डाव माहित नाही आणि कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले, अरे कुस्तीचा डाव माहितीय का बेटा ? असं म्हणत अजित पवार यांनी पुतण्या युगेंद्र पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती.